maratha reservation saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध; मंत्र्यांच्या शिष्टमंडळाचं आश्वासन

Delegation OF Ministers: मनोज जरांगे पाटील यांच्या लढाईला अर्ध यश मिळालं आहे. येणाऱ्या काळात राहिलेलं पूर्ण यश येईल,असं धनंजय मुंडे म्हणाले.

Bharat Jadhav

Maratha Reservation:

जरांगे पाटलांच्या लढ्याला यश मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मनोज जरांगे यांनी त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषण स्थगित केलं. त्यांनी २ जानेवारीपर्यंत सरकारला मुदत दिली. त्याबद्दल कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले. मनोज जरांगे पाटील यांच्या लढाईला अर्ध यश मिळालं आहे. येणाऱ्या काळात राहिलेलं पूर्ण यश येईल, असं धनंजय मुंडे म्हणाले. (Latest News)

सरकारच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने आज अंतरवली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. शिष्टमंडळाने मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागं घेतलं. दरम्यान या शिष्टमंडळात उदय सामंत, धनंजय मुंडे, बच्चू कडू यांचा समावेश होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरक्षणाची पूर्तता करण्यासाठी सरकाराला २ महिन्याचा वेळ देण्यास जरांगे- पाटील तयार झाले आहेत. महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांना सरकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचं मान्य करत असाल तर आपण सरकारला वेळ देऊन असं जरांगे-पाटील म्हणाले. उपोषण सोडल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटलांचे आभार मानले. आम्ही आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याचं सामंत म्हणाले.

दरम्यान वेळ घ्या पण आरक्षण द्या, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतलीय. सर्व आंदोलन आता बंद करा, असं आवाहन जरांगे यांनी राज्यभरातील मराठा आंदोलकांना केलं यावेळी केलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांना आरक्षण देण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ मागितला. मात्र मनोज जरांगे पाटील हे 24 डिसेंबरपर्यंत वेळ देण्यास ठाम होते. यानंतर सरकारी शिष्टमंडळाने विनंती केल्यानंतर त्यांनी आरक्षण देण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत सरकारला वेळ दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Infection : पावसाळ्यात होऊ शकतं फंगल इन्फेक्शन, सुरुवातीची ही ७ लक्षण ओळखा नाहीतर...

Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ हरहुन्नरी अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT