बैलगाडा शर्यत सुरु व्हावी हीच राज्य सरकारची भुमिका : अजित पवार  SaamTv
महाराष्ट्र

बैलगाडा शर्यत सुरु व्हावी हीच राज्य सरकारची भुमिका : अजित पवार

बैलगाडा शर्यत चालू व्हावी हीच राज्य सरकारची भुमिका आहे. मात्र सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे त्यास परवानगी देता येत नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

मंगेश कचरे

बारामती : बैलगाडा शर्यत चालू व्हावी हीच राज्य सरकारची भुमिका आहे. मात्र सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे त्यास परवानगी देता येत नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. बैलगाडा शर्यत सुरु व्हावी हि सरकारची मनोमन इच्छा आहे, मात्र, सरकारपेक्षा कोर्टाच्या निर्णयाला महत्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे देखील पहा -

पुढे बोलताना ते म्हणाले, बैल हा पाळीव प्राणी म्हणून न गणता वन्यप्राणी म्हणून गणला गेला आहे. त्यामुळे या अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेला प्रश्न असून संसदेत अनेकदा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सध्या काहीजण स्टंटबाजी करत आहेत असा नाव न घेता त्यांनी पडळकरांना टोला लगावला. या स्टंट करणाऱ्या लोकांचेच सरकार मागील पाच वर्षाच्या काळात होते. तेव्हा मात्र त्यांनी हा प्रश्न बाहेर काढला नाही त्यावेळेस त्यांना हा विषय मार्गी लावायला कोणीही अडवलं नव्हतं. तेव्हाही केंद्रात भाजपचं सरकार होतं आणि आताही केंद्रात त्यांचंच सरकार आहे.

सध्या केवळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम विरोधी पक्षाकडून सुरु असून आम्ही लोकांचं भलं करतोय असं दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. पडळकर यांनी बेकायदा व विनापरवाना आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीबाबत बोलताना पवार म्हणाले, वास्तविकतः कोणत्याही पक्षाची किंवा पक्षविरहीत व्यक्ती असेल आणि त्यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन होत असेल तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई होणारच आणि गुन्हे दाखल होणार असे ते म्हणाले.

अशा प्रकारे कोणतेही, बेकायदा कृत्य चालणार नाही. लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर सर्वांनीच कोरोना आणि आपत्ती नियमांचे पालन केलं, कारण ते सर्वांच्या हिताचं होतं. मात्र आपणच नियम करायचे आणि आपणच बेकायदा स्पर्धा घेऊन नियम मोडायचे हे योग्य नाही. तसेच राज्य सरकार बैलगाडा शर्यत व्हावी याच भूमिकेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs UAE : भारत दुबईत यूएईला भिडणार, हवामान अन् खेळपट्टीचा फायदा कोणाला होणार? वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update : ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावर, तर शिदेंचा वरळी डोममध्ये?

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात श्राद्धाला कावळा शिवला नाही तर काय करावे?

Pune Crime : पुण्यात भयंकर घटना, नराधम बापाचा पोटच्या मुलीवर ४ महिने अत्याचार; स्थानिकांनी फोडून काढलं

Risod Police : दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघेजण ताब्यात, आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT