पप्पा टेन्शमध्ये आहेत, ते काहीतरी करतील! ...(पहा व्हिडीओ) Saam Tv
महाराष्ट्र

पप्पा टेन्शमध्ये आहेत, ते काहीतरी करतील! ...(पहा व्हिडीओ)

एका मुलीने आपल्या एसटी महामंडळात नोकरी करत असलेल्या आपल्या वडिलांना कोणत्या अवघड मानसिक स्थितीतून जावे लागत आहे, याची विदारक कहाणी ती तिच्या तोंडून सांगत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

यवतमाळ : कोरोना Corona आणि लॉकडाउन Lockdown यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची वेतनाविना सुरू असलेली परवड आता सर्वानाच माहित होऊ लागली आहे. त्यांच्यासाठी कधी कुणी पत्र Letter लिहून तर कुणी सोशल मीडियाच्या Social Media माध्यमातून आपली व्यथा मांडत आहे. आता एका मुलीने आपल्या एसटी महामंडळात नोकरी करत असलेल्या आपल्या वडिलांना कोणत्या अवघड मानसिक स्थितीतून जावे लागत आहे, याची विदारक कहाणी ती तिच्या तोंडून सांगत आहे.

यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील एसटी मधील कर्मचारी प्रमोद पंदरे यांची मुलगी हर्षदा हिने व्हीडिओ बनवत त्यासमोर आपली आणि आपल्या घरटी पगार नसल्यामुळे ओढवलेली वाईट परिस्तिथी याबद्दल सांगत आहे. आपल्या वडिलांची पगाराअभावी दुर्दैवी कहाणी कथन करून सांगत आहे.

हर्षदा म्हणते की, गेल्या दोन महिन्यांपासून माझ्या वडिलांना पगारच मिळालेला नाही. पगार नसल्याने माझे पप्पा नेहमी विचारात पडलेले असतात. आमच्याशी व्यवस्थित बोलत नाहीत. काही विचारायला गेलं तर रागावतात. तर मी पगार नसल्यामुळे खूप चिंतेत आहे असे सांगतात. आमच्या ट्युशनचे पैसेही ते देऊ शकत नाहीत. आता आम्ही काय करावे हे आम्हाला परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

Maharashtra News Live Updates: मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक मंदावली

Washim Bajar Samiti : आठवडाभरातच सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक; वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीतील स्थिती

Devendra Fadnavis : 'बटेंगे तो कटेंगे' हा देशाचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांचं योगींच्या घोषणेला समर्थन

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT