एसटी कर्मचाऱ्यांची हेळसांड काही नवी नाही. त्यात आता या कर्मचाऱ्यांचं 100 कोटींचं नुकसान झालंय. मात्र हे 100 कोटी कुणी खाल्ले? पाहा या स्पेशल रिपोर्टमधून. एसटी महामंडळाच्या या भोगळ कारभारामुळे कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
राज्यात एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता तब्बल 87 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली तब्बल 1240 कोटींची रक्कमच एसटी महामंडळाने पीएफ ट्रस्टमध्ये भरली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांचे 100 कोटी बुडाल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केलाय.
एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि ग्रॅच्युटीचे दोन स्वतंत्र ट्रस्ट असतात. त्यात एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांचा पीएफ आणि ग्रच्युटीची रक्कम जमा केली जाते. पण फेब्रवारी 2024 पासून एसटीने दोन्ही ट्रस्टकडे रक्कम भरणा केलेली नाहीय. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना अडचणी निर्माण होणारेत. ते पाहूयात
एसटीचा भोंगळ कारभार, कर्मचारी बेजार
कर्मचाऱ्यांच्या पीएफचा दोन्ही ट्रस्टकडे भरणा
ट्रस्टकडून पीएफ गुंतवणूक
एसटीकडून वर्षभरापासून या रकमेची गुंतवणूक नाही
गुंतवणूक न केल्याने व्याज आणि चक्रवाढ व्याज बुडाले
एसटीकडून पीएफच्या नियमांची पायमल्ल
मात्र एसटी महामंडळाने पगारातून कपात केलेली रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये का भरलेली नाही? एसटीची रक्कम कुठे वळवली? कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारं धोरण एसटी बुडवण्यासाठी आहे का? असा सवाल कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी पीएफ ऑफिस कुणावर कारवाई करणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.