ST कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपावर कर्मचाऱ्याच्या मुलाचं रॅप साँग; पाहा Video  Saam TV
महाराष्ट्र

ST कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपावर कर्मचाऱ्याच्या मुलाचं रॅप साँग; पाहा Video

धुळे आगारामध्ये कार्यरत असलेल्या शिपाई कौतिक सोनवणे यांच्या हर्षल सोनवणे या मुलाने हे रॅप सॉंग गाऊन झोपलेल्या राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

भुषण अहिरे

धुळे: एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावं या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामागील एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा व्यक्त करण्यासाठी धुळे आगारातील एका कर्मचाऱ्याच्या मुलाने रॅप सॉंगच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अल्प मानधनामुळे होत असलेला त्रास त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांची राज्य शासनातर्फे होत असलेली पिळवणूक दर्शविण्यासाठी व एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी सध्या समाजामध्ये फॅड असलेल्या रॅप सॉंगचा आधार घेण्यात आला आहे.

धुळे आगारामध्ये कार्यरत असलेल्या शिपाई कौतिक सोनवणे यांच्या हर्षल सोनवणे या मुलाने हे रॅप सॉंग गाऊन झोपलेल्या राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. धुळ्यातील एसटी कामगाराच्या मुलाने सुरु असलेल्या संपाबाबत चित्रित केलेलं रॅप सॉंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT