ST Employees Strike Saam Tv
महाराष्ट्र

ST Employees Strike: प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक; विभागीय कार्यालयापुढे बेमुदत उपोषण सुरू

ST Employees Hunger Strike : प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी विभागीय कार्यालयापुढे बेमुदत उपोषण सुरू केलं आहे.

Rohini Gudaghe

Maharashtra ST Employees Hunger Strike

राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या आर्थिक मागण्यांवर शासन, प्रशासन पातळीवर झालेल्या बैठकीत अनेक निर्णय घेतले होते. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी अजूनही झाली नाही. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण आंदोलन (ST Employees Strike) करण्यात येत आहे. (Maharashtra News)

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे. विभागीय कार्यालयापुढे हे आंदोलन करण्यात येत आहे. प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळत (ST Employees Hunger Strike) आहे. एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण

शासन पातळीवर झालेल्या बैठकीमध्ये घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयाचीही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही त्याची अद्याप अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली (Maharashtra ST Employees)आहे.

राज्य परिवहन कामगारांना (ST Employees) महामाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीच्या वाढीव दराची थकबाकी मिळावी, त्रिसदस्यीय समितीची बैठक लवकर आयोजित करून सकारात्मक निर्णय घ्यावा, महामाई भत्ता थकबाकीसह लागू करावा, कामगारांना थकबाकी द्यावी, हिट ॲण्ड रनचा कायदा रद्द करावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयक रकमा तत्काळ देण्यात याव्या, या मागण्यांकरिता विभागीय कार्यालयापुढे आंदोलन करण्यात येत ( ST Employees Demand) आहे.

एसटी कर्मचारी संतप्त

एसटी कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणास बसले आहेत. मागण्यांबाबत कोणताच विचार होत नसल्याने एसटी कर्मचारी संतप्त झाले (Maharashtra ST Employees) आहेत.

या आंदोलनानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर एसटी सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा देखील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे. सर्व प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी १३ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केलं (latest news) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT