Sharad Pawar on ST Employee Strike  Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar: ST कर्मचाऱ्यांना दोष देता येणार नाही, त्यांना भडकवलं - शरद पवार

देशातील सत्तेचा वापर करून महाराष्ट्र सरकार संकटात आणण्याचे काम सुरू आहे. मंत्र्यांना अडचणीत आणून सरकार अस्थिर करण्याचे काम सुरू आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

अमरावती : आज अमरावतीत राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलतना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) अनेक विषयांवर भाष्य केलं. शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनावर ते म्हणाले, 'या प्रकरणात एसटी कर्मचाऱ्यांना भडकविले त्यातून प्रकार घडला. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना (ST employees) दोष देता येणार नाही. असं पवार म्हणाले. (Sharad Pawar on ST Employee Strike)

दरम्यान, कार्यकर्त्यांच्या मनात असलेली अस्वस्थता दूर करण्यासाठी दोन दिवसांच्या शिबिराची गरज आहे. हे राज्य आपल्या हातात राहलं नाही म्हणून काही लोक अस्वस्थ आहेत. देशातील सत्तेचा वापर करून महाराष्ट्र सरकार संकटात आणण्याचे काम सुरू आहे. मंत्र्यांना अडचणीत आणून सरकार अस्थिर करण्याचे काम सुरू असल्याचं गंभीर वक्तव्य शरद पवार यांनी यावेळी केलं

नरसिंहराव यांच्या काळात दंगली घडल्या, त्यावेळी मी संरक्षण मंत्री होतो, लोकांना समजवायला रोज जात होतो. त्याच दरम्यान बॉम्ब स्फोट झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा, काँग्रेसचा कार्यकर्ता डगमगला नाही. दोन दिवसात मुंबई पुन्हा सुरू झाली संकट कितीही आली तरी डगमगायने नसते खिलारी या भूकंप आला, भयानक संकट होतं, शासकीय यंत्रणा, कार्यकर्त्यांची मदत एका वर्षात सर्वांची घरं बांधून दिली, त्यामुळं संकटाला घाबरायचे नाही.

काल झालेला हल्ला हा महत्त्वाचा नाही, त्याला तोंड दिले पाहिजे. काश्मीर पंडितांवर एक सिनेमा आलाय, त्यात हिंदूंवर कसा हल्ला झाला हे सांगण्याचा प्रयत्न झाला, देशात हिंदूमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचे काम सुरू आहे.

त्या वेळी व्ही. पी सिंग सत्तेत होते, त्यावेळी हल्ले झाले ही भारतीय जनता पक्षाची जबाबदारी होती. देशात हिंदू मुस्लिम वाद घडवून, जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अशांच्या विरोधात काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) तयार आहेत. देशात पेट्रोल, डिझेल च्या किमती वाढत आहेत, याची किंमत सर्वसामान्यांना मोजावी लागत आहे.

तरुणांना रोजगार नाही, राज्या राज्यात वाद निर्माण करायचा हे केंद्राकडून सुरू आहे. मात्र यासाठी एका विचाऱ्याच्या लोकांना एकत्र येण्याची गरज असल्याचंही पवार म्हणाले. केलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात असलेली अस्वस्थता दूर करण्यासाठी दोन दिवसांच्या शिबिराची गरज आहे. हे राज्य आपल्या हातात राहलं नाही म्हणून काही लोक अस्वस्थ आहेत. देशातील सत्तेचा वापर करून महाराष्ट्र सरकार संकटात आणण्याचे काम सुरू आहे. मंत्र्यांना अडचणीत आणून सरकार अस्थिर करण्याचे काम सुरू असल्याचं गंभीर वक्तव्य पवार यांनी यावेळी केलं तसंच गेले 40-45 वर्षे एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना भडकविले त्यातून प्रकार घडला यात एसटी कर्मचाऱ्यांना दोष देता येणार नाही असही ते म्हणाले.

काल झालेला हल्ला हा महत्त्वाचा नाही, त्याला तोंड दिले पाहिजे. काश्मीर पंडितांवर एक सिनेमा आलाय, त्यात हिंदूंवर कसा हल्ला झाला हे सांगण्याचा प्रयत्न झाला, देशात हिंदूमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्या वेळी व्ही. पी सिंग सत्तेत होते, त्यावेळी हल्ले झाले ही भारतीय जनता पक्षाची (BJP) जबाबदारी होती.

देशात हिंदू मुस्लिम वाद घडवून, जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अशांच्या विरोधात काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहेत. देशात पेट्रोल, डिझेल च्या किमती वाढत आहेत, याची किंमत सर्वसामान्यांना मोजावी लागत आहे. तरुणांना रोजगार नाही, राज्या राज्यात वाद निर्माण करायचा हे केंद्राकडून सुरू आहे. मात्र यासाठी एका विचाऱ्याच्या लोकांना एकत्र येण्याची गरज असल्याचंही पवार म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

SCROLL FOR NEXT