Maharashtra ST bus carrying 28 passengers loses wheel  Saam TV Marathi
महाराष्ट्र

ST Bus Accident : महामार्गावर थरार! धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळले अन्..., २८ जण करत होते प्रवास

Gadchiroli ST bus rear wheel came off incident : गडचिरोलीतील अहेरी-सिरोंचा मार्गावर धावत्या एसटी बसचे मागील चाक अचानक निखळून १०० फूट दूर जाऊन पडले. बसमध्ये २८ प्रवासी होते; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

Namdeo Kumbhar

Maharashtra ST bus carrying 28 passengers loses wheel : गडचिरोलीतील अहेरी आगारातून सिरोंच्याकडे जाणाऱ्या एसटी बसचे धावत्या अवस्थेत मागील चाक अचानक निखळले. अन् तब्बल १०० फूट दूर जाऊन पडल्याची धक्कादायक घटना मेळाराम गावाजवळ घडली. घटनेच्या वेळी बसमध्ये २८ प्रवासी प्रवास करत होते. चाक निखळल्याचे लक्षात येताच चालकाने अत्यंत प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-४० ए.क्यू.-६१२५ क्रमांकाची एसटी बस अहेरी आगारातून सिरोंच्याकडे जात होती. मेळाराम गावाजवळ बस पोहोचताच अचानक तिच्या मागील बाजूचे चाक निखळले. धावत्या बसचे चाक वेगळे होऊन सुमारे १०० फूट अंतरावर शेतात जाऊन पडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, चालकाने तत्परता दाखवत बस सुरक्षितपणे थांबवली आणि २८ प्रवाशांचे प्राण सुखरूप वाचवले.

देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह:

विशेष म्हणजे, बस रस्त्यावर धावण्यापूर्वी तिची 'प्रि-ट्रिप इन्स्पेक्शन' (Pre-trip Inspection) तसेच नट-बोल्टची योग्य प्रकारे तपासणी करण्यात आली होती, अशी माहिती अहेरी आगाराचे डेपो मॅनेजर खाडिलकर यांनी दिली. सध्या संबंधित बस सिरोंचा आगारात असून, अहेरी आगारात परतल्यानंतर तिची सविस्तर तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर चाक निखळण्याचे नेमके कारण स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

पण आगारातून निघताना नियमित तपासणी झाल्याचा दावा केला जात असला, तरी भरधाव बसचे चाक अशा प्रकारे निखळल्याने एसटी महामंडळाच्या देखभाल व दुरुस्ती व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नट-बोल्ट व्यवस्थित कसले (तपासले) होते का? की 'व्हील असेंब्ली'मध्ये (Wheel Assembly) काही तांत्रिक बिघाड होता? या सर्व बाबींची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena SC Case Live : एकनाथ शिंदेंची नियुक्ती पक्षाच्या घटनेनुसारच झाली, मग अचानक 2018 ची घटना लोकशाहीविरोधी कशी ठरली?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर, शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी

नांदेडमध्ये माजी उपमुख्यमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला; रुग्णालयात दाखल, मोठी खळबळ

Kangana Ranaut: नसीरुद्दीन शाहांच्या वक्तव्यावर कंगना रणौतचा पलटवार; म्हणाली, बॉलिवूड पाकिस्तानची प्रेमकहाणी कधी संपणार?

नागपंचमीला बनवा अस्सल पारंपारिक 'पुरणाचे दिंड'; जाणून घ्या ही मराठमोळी रेसिपी

SCROLL FOR NEXT