ST BUS
ST BUS Saam Tv
महाराष्ट्र

ST Bus Accident: अमरावतीत एसटी बसला अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस थेट नाल्यात कोसळली

साम टिव्ही ब्युरो

अमरावती : अमरावतीत राज्य महामंडळाची बस (एसटी बस) रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल नाल्यात कोसळल्याची घटना समोर आली आले. बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातात एक दुचाकी चालक आणि बस ड्रायव्हर जखमी झाले असून त्यांच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Latest News Update)

अपघातग्रस्त बस भंडाऱ्याहून अमरावती जिल्ह्यातील परतवाडाकडे निघाली होती. भंडाऱ्याहून निघाल्यानंतर बस अमरावती जिल्ह्यातील रिंग रोड रहाटगाव येथील नाल्यात जाऊन आदळली. समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरचे संतुलन बिघडल्याने ही एसटी बस नाल्यात जाऊन आढळली. (Bus Accident)

या घटनेमुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. बसमध्ये किमान 30 ते 35 प्रवासी असल्याची माहिती मिळाली असून यात ड्रायव्हरला दुखापत झाला आहे. तर दुचाकी चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय उपचार सुरू आहे. इतर प्रवासी सुदैवाने सुखरूप आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar On Sharad Pawar: एके काळी शरद पवारांना दैवत मानत होतो, अजित पवार नेमकं काय बोलले?

Ajit Pawar News : डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्षे लागली, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंना उत्तर

Anushka Sharma: अभिनेत्री नव्हे तर 'या' क्षेत्रात अनुष्काला करायचे होते करिअर

Anushka Sharma Birthday: वडील लष्करात, लेक झाली बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री; अनुष्का शर्माचा इथवरचा प्रवास आणि संपत्ती किती?

Thane Lok Sabha News| ठाण्यात ठाकरे वि. शिंदे गट लढत होणार, नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर

SCROLL FOR NEXT