Nagpur Pune Highway Accident Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana Accident: नागपूर-पुणे महामार्गावर एसटी आणि ट्रक भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 13 जखमी

Buldhana Accident News: या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 13 प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

संजय जाधव

Nagpur Pune Highway Accident News Today: सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावानजिक ट्रकने समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकूण मृतकांची संख्या 8 झाली असून 13 प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

अपघातात (Accident) जखमी झालेल्या लोकंना तात्काळ सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णाल्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातात एसटी आणि ट्रक या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस संभाजीनगरहून वाशिमच्या (Washim) दिशेने जात होती. त्याचवेळी सकाळी 6च्या दरम्यान ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 13 प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Accident News)

त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.अपघाताच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आहेत. तसंच मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health checkups after 40: वयाच्या 40 नंतर शरीरात सुरू होतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या या ४ टेस्ट करून घ्याच!

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

Vidhan Parishad Result: बंडखोर खासदार आष्टीकरांना मोठा धक्का, विधान परिषद निवडणुकीत मुलाचा पराभव

Sanjay raut: “फडणवीसांच्या चेहऱ्यावरील हसू खोटं, भाजपमध्ये थेट ओपन वॉर सुरू”; संजय राऊतांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT