SSC-HSC Supplementary Exam Saam Tv
महाराष्ट्र

SSC HSC Supplementary Exam: दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा पेपरच्या तारखात बदल; जाणून घ्या नवीन तारीख

SSC HSC Supplementary Exam: दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेदरम्यान होणाऱ्या पेपरच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

Bharat Jadhav

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी अतिवृष्टी होईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलाय. त्यामुळे दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेदरम्यान शुक्रवारी होणारे पेपर पुढे ढकलण्यात आलेत,अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलीय.

राज्य मंडळामार्फत जुलै ते ऑगस्ट महिन्यात परीक्षा घेण्यात येत आहे. दहावीची पुरवणी परीक्षा १६ ते ३० जुलै आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होत आहे. या परीक्षेत उद्या शुक्रवारी दहावीचा ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन’ या विषयाचा पेपर सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान होणार होता. या पेपरची तारीख बदलण्यात आली असून हा पेपर आता ३१ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान होईल.

तर बारावीच्या परीक्षेतील वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान आणि एम.सी.व्ही.सी. पेपर दोन (ईबी टू एक्सबी= २०) विषयांचे पेपर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान होणार होते. आता हे पेपर ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते २ वाजेदरम्यान होणार आहेत. तर दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या लेखी आणि अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती राज्य मंडळाच्या सहसचिव मेधा निरफराके यांनी दिली.

दहावी-बारावीच्या परीक्षेचे बदललेले वेळापत्रक

दहावी : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ : २६ जुलै (वेळ- सकाळी ११ ते दुपारी १) : ३१ जुलै (वेळ -सकाळी ११ ते दुपारी १)

बारावी : १. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, २. अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, ३. एम.सी.व्ही.सी पेपर २ (ईबी टू एक्स बी=२०) : २६ जुलै (वेळ सकाळी ११ ते दुपारी २) : ९ ऑगस्ट (वेळ सकाळी ११ ते दुपारी २)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO New Rule: पीएफची २ महिन्याची 'ती' अट रद्द, EPFO ने घेतला मोठा निर्णय, नव्या नियमाचा तुम्हाला किती फायदा?

Maharashtra Live News Update: पालघारमधील अनेक माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंची ताकद वाढली

Solapur-Mumbai Flight : सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! आजपासून सुरु होणार सोलापूर-मुंबई विमानसेवा | VIDEO

Accident News : वाळूने भरलेल्या टिप्परने दुचाकीस्वाराला चिरडले, मृतदेहाचे तुकडे, भंडाऱ्यात भयानक अपघात

Ravi Naik passes away : माजी मुख्यमंत्र्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, संपूर्ण गोव्यावर शोककळा

SCROLL FOR NEXT