SSC HSC Result Saam tv
महाराष्ट्र

SSC HSC Result: दहावी-बारावीचा निकाल या तारखेला होणार जाहीर; कुठे अन् कसा पाहाल?

SSC HSC Result 2025 Date: दहावी-बारावीचा निकाल मे महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निकाल तुम्ही ऑनलाउइन पद्धतीने पाहू शकतात. दहावी-बारावीचा निकाल कसा पाहायचा त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दहावी-बारावीचे विद्यार्थी आता निकालाची वाट बघत आहे. दहावी- बारावीच्या निकालाची संभाव्य तारीखदेखील समोर आलेली आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर लगेच दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागू शकतो. परंतु याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत माहिती दिली होती.दहावी-बारावीच्या सर्व प्रश्नपत्रिका तपासून झालेल्या आहेत. त्यामुळे लवकरच हा निकाल जाहीर होणार आहे. काही वेबसाइटनुसार, दहावीचा निकाल १५ मे २०२५ तर बारावीचा निकाल ६ मे २०२५ रोजी लागू शकतो.

दहावी-बारावीचा निकाल कुठे अन् कसा पाहाल? (How To Check HSC SSC Result)

तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतात.

https://www.mahahsscboard.in/mr

https://mahresult.nic.in/

https://sscresult.mkcl.org/

https://hscresult.org/

या चार वेबसाइटवरुन तुम्ही तुमचा निकाल पाहू शकतात. यातील काही वेबसाइट निकालाच्या दिवशी ओपन होतील. त्यावर जाऊन निकाल पाहू शकतात.

दहावी-बारावीचा निकाल पाहण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस (SSC HSC Result Online Process)

सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. https://mahresult.nic.in/ या साइटवर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला दहावी की बारावी हा पर्याय निवडायचा आहे.

यानंतर तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. यानंतर आईचे नाव लिहायचे आहे.

यानंतर रिझल्ट बटणवर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला ई-मार्कशीट डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल.

या मार्कशीटची प्रिंट आउट काढून तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता.

दहावी-बारावीची मार्कशीट कशी डाउनलोड करायची? (How To Download SSC HSC Marksheet)

दहावी-बारावीची मार्कशीट तुम्ही ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करु शकतात. डिजिलॉकर या अॅपवरुन तुम्ही मार्कशीट डाउनलोड करु शकतात. सर्वप्रथम तुम्हाला डिजिलॉकरवर अपार आयडी रजिस्टर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला SSC Result हे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला मार्कशीट ओपन होईल. हे तुम्ही डाउनलोड करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT