HSC Exam 2023 saam tv
महाराष्ट्र

SSC-HSC Board Result 2023 : दहावी-बारावी निकालासंदर्भात मोठी अपडेट; बोर्ड अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

अद्यापही शिक्षकांनी झालेले पेपर तपासण्यास सुरुवात केलेली नाही.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Board Exams 2023 : राज्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होताना दिसत आहे. अशात आता बोर्डाच्या निकालांवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सुरूवातीला शिक्षक नंतर शासकीय कर्मचारी यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे आता दहावी-बारावी परीक्षेचा निकाल उशीरा लागण्याची शक्यता वर्तवली आहे. (12th and10th board exam Result 2023)

अजूनही पेपर तपासणी सुरूच नाही.

इयत्ता दहावी-बारावीचे बहुतेक पेपर झाले आहेत. २५ मार्च रोजी दहावीचा शेवटचा पेपर आहे. अशात अद्यापही शिक्षकांनी झालेले पेपर तपासण्यास सुरुवात केली नाही. बोर्डअधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. संपावर जाण्याआधी काही शिक्षकांनी पेपर तपासण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी हातात घेतलेले काही पेपर तपासून झाले आहेत. मात्र त्यानंतर संप सुरू झाल्यापासून शिक्षकांनी पेपर तपासण्यासाठी घेतले नाहीत.

संप असल्याने अद्यापही शिक्षकांनी पेपर तपासण्यास सुरूवात केलेली नाही. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर याचा परिणाम होत आहे. निकाल उशीरा लागल्यास पुढील अॅडमीशन देखील उशीरा होणार त्यामुळे शिक्षकांना पेपर तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संपामुळे बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाला ८-१० दिवस उशीर होण्याची शक्यता आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?

>> नवीन पेन्शन योजना (NPS) रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना (OPS) पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा.

>> कंत्राटी व योजना कामगार प्रदिर्घकाळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देऊन त्यांच्या सेवा नियमित करा.

>> सर्व रिक्त पदे तत्काळ भरा. (आरोग्य विभागास अग्रक्रम द्या) तसेच चतुर्थश्रेणी व वाहन चालक कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस केलेला मज्जाव तत्काळ हटवा.

>> अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाशर्त करा. तसेच कोरोना काळात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वयाधिक झालेल्या पाल्यांना विहित वय मर्यादेत सूट द्या.

>> सर्व अनुषंगिक भत्ते केंद्रासमान मंजूर करा.

>> चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे निरसित करु नका. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने मांडलेल्या इतर सर्व प्रलंबित मागण्या सत्वर मंजूर करा.

>> शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न (सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना १०:२०:३० वर्षे व इतर) तत्काळ सोडवा.

>> निवृत्तीचे वय ६० वर्षे करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; ९०,००० रुपये पगार; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

Women’s World Cup : ३ पराभवानंतरही संधी कायम, उपांत्य फेरीचं तिकिट कसं मिळणार? वाचा संपूर्ण गणित

ठाकरे गटाला दिवाळीत बंपर लॉटरी! भाजपमधील महिला नेता शिवसेनेच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार

Ranjeet Kasle : झुकेगा नहीं.. बीडच्या रणजीत कासलेच्या मुसक्या आवळल्या, अटक करताच केली पुष्पाची स्टाईल

SCROLL FOR NEXT