buldhana accident  saam
महाराष्ट्र

Buldhana Accident: भरधाव ट्रकनं दुचाकीस्वारास उडवलं, एकजण जागीच ठार

Truck hit biker : बुलढाणा जिल्ह्यातील दोन ठिकाणी अपघाताच्या दोन घटना घडल्यात. दोन्ही ठिकाणी झालेल्या अपघातात ट्रकने दुचाकीं धडक दिलीय. यातील एका घटनेत १७ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झालाय तर दुसऱ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

(संजय जाधव)

Buldhana And Bike Accident :

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात असलेल्या मूर्ती गावाजवळील फाट्यावर दुचाकी आणि ट्रकचा अपघात झाला. भरधाव ट्रकने समोर असलेल्या दुचाकीला जबर धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर एकजण जखमी झालाय. दौलत भिका मेढे ( वय ५५ ) असं अपघातात मृत झालेल्या व्यक्ती नाव आहे. तर जगन सूर्यभान गवई (वय ५५) असं जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Latest News)

या अपघातात दुचाकीवरील एक जणाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल कारण्यात आले आहे. बोराखेडी पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजुर येथील जगन सूर्यभान गवई खैरखेड येथील दौलत भिका मेढे हे मोताळा येथील आपलं काम निपटून घरी परतत होते. मूर्ती फाट्यानजीक भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात जखमी असलेल्या जगन गवई याला जिल्हा सामान्य रुग्णाल्यात भरती करण्यात आले आहे.

रेतीच्या ट्रकने मुलीला चिरडले; शेगाव जवळील घटना

शेगाव तालुक्यातील भोनगाव येथून मोटरसायकलवर मागे बसून शेगावला येत असलेल्या एका सतरा वर्षांच्या मुलीला मागून भरधाव आलेल्या रेतीचे गाडीने चिरडले. यामध्ये ती मुलगी जागीच ठार झाल्याची घटना शेगाव तालुक्यातील कालखेड जवळ घडली.

एका दुचाकीला रेती वाहणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एका १७ वर्षाच्या मुलीचा चिरडून मृत्यू झाला. ही मुलगी भोनगाव येथून दुचाकीवर बसून शेगावला जात होती. अपघाताची घटना शेगाव तालुक्यातील कालखेड जवळ घडली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर तसेच पोलीस स्टेशनला गर्दी केली. मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या त्या अवैध रेती वाहन चालकावर तत्काळ कठोर कारवाई करावी अशी, मागणी नागरिकांनी केली. कु. गौरी राजेश शेळके असं मृत मुलीचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT