Accident News : दोन दुचाकींची समोरा-समोर धडक; वाहनाखाली येऊन काका-पुतण्यांचा चिरडून मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar Accident News:
छत्रपती संभाजीनगरमधील करमाड- पिंप्रिराजा मार्गावरील मंगरूळ शिवारात भीषण अपघात झाला. करमाड- पिंप्रिराजा मार्गावर दोन दुचाकीची समोरा-समोर धडक झाली. त्यानंतर दुचाकीवरील चार जण रस्त्यावर फेकले गेले. त्याचवेळी अज्ञात वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झालाय. (Latest News)
दोन दुचाकींचा समोरासमोर झालेल्या अपघातानंतर दुचाकीवरील चार जण रस्त्यावर फेकले गेले. त्याचवेळी अज्ञात वाहनाने त्यांना चिरडलं. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड-पिंप्रिराजा मार्गावर मंगरूळ शिवारात घडला. आकाश शिवाजी कांबळे(वय२६), कैलास एकनाथ कांबळे (वय४२, दोघे,रा. सांजखेडा,ता. छत्रपती संभाजीनगर) आणि प्रताप साळुबा बनसोडे (वय४०,रा. पिंप्रिराजा,ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृताचे नावे आहेत. तर शंकर लक्ष्मण थोरात (रा. नागेवाडी,ता. जालना) असे जखमी झाल्याचे नाव आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शंकर थोरात हे करमाड- पिंप्रिराजा मार्गाने दुचाकी क्र.(एम.एच. २१ए ई १६१३) वरून करमाडकडे येत होते. तर आकाश कांबळे हे शेंद्रा डीएमआयसीतून आपले काम आटोपून दुचाकी क्र.( एम.एच. २० इ एम ०२६३) वरून ट्रिपलसीट करमाडहून पिंप्रिराजा मार्गे सांजखेडा येथे जात होते. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता मंगरूळ शिवारात दोन्ही दुचाकींची समोरा-समोर धडक झाली
या धडकेमुळे दोन दुचाकीवरील चार जण रस्त्यावर फेकले गेले. याचवेळी या मार्गावरून जाणाऱ्या एका अज्ञात वाहन ३ जणाच्या अंगावरून गेले. यात अपघात स्थळाचे चित्र भयावह होते. रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पाहून येणारे जाणारे हळहळ व्यक्त करीत होते. करमाड पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, विजय जारवाल, विनोद खिल्लारे, शकुल बनकर यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. यावेळी घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी आकाश कांबळे, कैलास कांबळे आणि प्रताप बनसोडे यांना तपासून मयत घोषित केले. तर जखमींवर उपचार सुरू आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.