Kolhapur Accident Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Accident: कोल्हापूरात अपघाताचा थरार, भरधाव कार पुलावरून ओढ्यात कोसळली; एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

Kolhapur Car Accident: कोल्हापूरमध्ये भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव कार पुलावरून ओढ्यात कोसळली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले.

Priya More
  • कोल्हापूरच्या शिरोली जकात नाक्याजवळ भीषण अपघात

  • भरधाव कारने संरक्षण कठडे तोडून पुलावरून ओढ्यात कोसळली

  • अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला

  • तिघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये भीषण अपघात झाला. भरधाव कार पुलावरून खाली कोसळली. शिरोली जकात नाक्याजवळ ही घटना घडली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या शिरोली जकात नाक्याजवळ आज सायंकाळीच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव कार रस्त्यावरील संरक्षक कठडे तोडत थेट पुलावरून सुमारे ३० फूट खोलावर कोसळली. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडला. तावडे हॉटेल चौकातून बाजार करून परत येत असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा कारवरील ताबा सुटला. कारने आधी लोखंडी संरक्षण कठड्याला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर पुलावरून थेट ओढ्यात सुमारे ३० फूट खाली कोसळली. या भीषण अपघातात दुर्गाप्रसाद उर्फ दुर्गेश उवाप्पा ईटी यांचा जागीच मृत्यू झाला. तर अर्जुन रमेश चौगुले (वाहन मालक), रोहित मलीक माने आणि रोहित राजू जोंधळे हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, सातारा रहिमतपूर रस्त्यावर देखील भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्तयावर उलटली. या कारमधील महिला बाहेर फेकली जाऊन याच कारखाली येऊन तिचा मृत्यू झाला. तर या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT