Bhagwan Rampure Saam Tv
महाराष्ट्र

Special Story : शिवरायांचा पुतळा कोसळल्यासारख्या घटना घडू नये, म्हणून काय करावं? तज्ज्ञांनी सांगितली महत्वाची माहिती

Shivaji Maharaj Statue : शिवरायांचा पुतळा कोसळल्यासारख्या घटना घडू नये, म्हणून काय करावं, यासाठी सुप्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

Saam Tv

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी कोसळल्याची घटना घडली होती. यानंतर राज्यभरात अनेक शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. तर विरोधी पक्षही यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यातच शिवरायांचा पुतळा कोसळल्यासारख्या घटना घडू नये, म्हणून काय करावं, यासाठी सुप्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

पुतळा निर्मितीसाठी टेंडरचे नियम काय आहेत?

शिल्पकार भगवान रामपुरे म्हणाले आहेत की, ''छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे. पुतळा कोणत्या शिल्पकाराने केला हे महत्वाचं नाहीये. याला शिल्पकारच नसून अनेक जण जबाबदार आहेत. कारण टेंडर काढतेवेळेस नियम असा आहे की, जो सर्वात कमी कोटेशन देईल त्यालाच दिले जाते. त्यामुळे जे अनुभवी कलावंत आहेत आणि योग्य भाव लावतात त्यांना ते काम मिळत नाही आणि नकोय त्या माणसाला काम मिळत.''

भगवान रामपुरे म्हणाले की, ''स्वानुभव फार मोठा आहे, मागच्या 40 वर्षांचा अनुभव पाठीशी असल्याने मागच्या 20 वर्षांपासून मी टेंडर पद्धतीने काम करणे बंद केले आहे. 2003 ला सोलापूर महापालिकेच्या झाशीच्या राणीच्या पुतळ्याचे शेवटचं काम टेंडर पद्धतीने केलं आणि त्यातून जो अनुभव आला तेंव्हापासून टेंडर पद्धतीने काम करणे बंद केलं.''

पुतळ्यांसाठी जागा निवडताना काय काळजी घ्यावी?

रामपुरे म्हणाले, ''जेंव्हा पुतळा 15 फुटांच्या वरती जातो तेंव्हा ते फक्त शिल्पकाराचे काम न राहता इंजिनिअरिंगचंही त्यात येतं. जेवढी पुतळ्याची उंची असते तेवढाच त्याचा पाया भक्कम असणे ही महत्वाचे असते. जेवढी पुतळ्याची उंची असते तेवढाच त्याचा पाया भक्कम असणे ही महत्वाचे असते. भक्कम पाया करण्यासाठी जमिनीचा सर्वे करणे गरजेचे असते. मुरूम, माती, पाणी, खडकी याचा विचार प्रामुख्याने केला जातो. जर काळे खडक असेल तर त्याला उत्तम समजले जाते. त्यामुळे जमीन पाहूनच मोठ्या पुतळ्यांसाठी जागा निवडली जाते.''

ते म्हणाले, ''भूकंप झाला तरी पुतळ्यांना तडा जाऊ नये, अशा पद्धतीची जागा निवडली जाते. यामध्ये साधारण 500 वर्षांची गॅरंटी असल्याशिवाय एवढे मोठे पुतळे उभारले जातं नाहीत. कोट्यावधी रुपयांचा खर्च पुतळा उभारण्यासाठी होत असल्याने त्याची मजबुती देखील तेवढीच महत्वाची असते.''

भगवान रामपुरे पुढे म्हणाले की, ''छत्रपती शिवारायांचा पुतळा उभारण्याचे काम 24 वर्षांच्या मुलाला देण्यात आलं. त्यामुळे त्याला अनुभव किती असेल? मागच्या पाच ते सहा वर्षात मोठ्या पुतळ्यांचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे याबाबतीत त्या मुलाचा अभ्यास किती आहे? मी त्या शिल्पकाराची मुलाखत वाचली ऐकली आहे. उद्घाटनाची तारीख ठरल्याने वेळ कमी मिळाला, त्यामुळे त्याने शिल्प उभे न कारता, त्याने रातोरात 3D मधून प्रिंट काढलीय. जर 3D ने शिल्पकार होणार असाल तर कॉलेजमध्ये शिकायला जाऊन शिल्पकार होण्याची गरज नाहीये.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

SCROLL FOR NEXT