Maharashtra News Updates: कोणी म्हणतं त्यांनी 70 वर्ष राज्य केलं, कोणी म्हणतं यांना सत्तेत येऊन 10 वर्ष होऊन गेली, तर कोणी म्हणत मला दोनच वर्ष झाली. प्रश्न कोणी सत्तेत येण्याचा, राहण्याचा नाही, पण जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू असताना आणि स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांनंतरही मुलभूत गरजांसाठी देशातील, राज्यातील जनेतला वणवण भटकावं लागतं आहे. कित्येक किलोमीटर पाटपीट करावी वागत आहे. नुकताच महाराष्ट्रातील काही घटनांनी भीषण वास्तव समोर आलं आहे. कित्येक सरकारं आली आणि गेलीही तरीही परिस्थिती बदलेली नाही.
पाच सहा दिवसांपूर्वी गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे दोन मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन पायपीट तब्बल १५ किमी पायपीट करावी लागली होती. या घटनने अख्खा महाराष्ट्र हळहळला असताना कोल्हापूरमधील चंदगडमध्येही अशीच एक घटना घडली आहे. तालुक्यतील बुझवडे येथील धनगरवाड्यातील वृद्धाला अर्धांगवायूचा झटका आला होता, मात्र गावात रस्ता नाही, त्यामुळे वाहन जात नाही, शिवाय पाऊस आणि अंधारातून वाट कशी काढायची हा प्रश्न होता, त्यामुळे पहाटेपर्यंत वाट पहावी लागली. पहाटे वृद्धाला डोलीत बसवून तब्बल ५ किमी पायपीट करावी लागली आहे, सुदैवाने नागरिकांनी मदत केल्यामुळे त्या वृद्धाचे प्राण वाचले आहेत.
धनगरवाडे हे मुळात जंगल आणि दुर्गम भागात येतात, त्यांची लोकसंख्याही कमी असते. बाजूच्या मोठ्या ग्राम पंचायतअंतर्गत येतात. धनगरवाड्यांची लोकसंख्या कमी त्यामुळे मतदानही कमी असंत. त्यामुळे लोकप्रतिनिधी या धनगरवाड्यांना निधी देताना राजकारण करतात. त्यामुळे कित्येक वर्ष दुर्गम भागातील हे वाडे विकासापासून वंचित राहिले आहेत. महाराष्ट्रीतील दुर्गम भागातील कित्येक गावांची हीच परिस्थिती आहे. गडचिरोली तर अतिशय दुर्गम समजला जातो, मात्र कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात अशा घटना समोर आल्या आहेत. घाटमाथ्यावरील कित्येक गावांमध्ये रस्ते नाहीत.
महाराष्ट्रातील काही ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये आजही रस्त्यांची सुविधा नाही. विशेषतः गडचिरोलीच्या दुर्गम भागातील भामरागड तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्याप पक्के रस्ते नाहीत, ज्यामुळे पावसाळ्यात या गावांचा इतर भागांशी संपर्क तुटतो. त्यामुळे आरोग्य सेवा पुरविण्यात अडचणी येतात. नागरिकांना कित्येक किमी पायपीट करावी लागते.
महाराष्ट्रातील अशी कित्येक गावं आहेत, ज्यांचा पावसाळ्यात नद्यांना पाणी आल्यामुळे संपर्क तुटतो. नद्यांवर पूल नाहीत त्यामुळे पाण्याची पातळी कमी होत नाही, तोपर्यंत मुख्य गावांशी, शहराशी संपर्क होत नाही. यात आतापर्यंत कित्येकांनी जीव गमावला आहे. तर उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. केवळ पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.