special camp organised to distribute kunbi caste certificate in dharashiv saam tv
महाराष्ट्र

Kunbi Caste Certificate : 'या' जिल्ह्यात शनिवार, रविवारी कुणबी प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष शिबिर

kunbi caste certificate : आत्तापर्यंत ४१४९ मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिली.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv News :

मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील (manoj jarange- patil) यांच्या १० फेब्रुवारी रोजीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शासनाने आता कुणबी प्रमाणपत्र (kunbi certificate) वितरणाला गती देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. न्यायमूर्ती शिंदे समीती व विभागीय आयुक्तांनी धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीत अधिका-यांना महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाने ४२ लाख २५ हजार २४२ अभिलेखाची तपासणी केल्यानंतर ३४४० नोंदी सापडल्या आहेत. तर वंशावळ जुळणाऱ्या ४३७२ व्यक्तींनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. (Maharashtra News)

आत्तापर्यंत ४१४९ मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे (dharashiv collector sachin ombase) यांनी दिली. येत्या १० व ११ फेब्रुवारीला धाराशिव जिल्ह्यात विशेष कॅम्प घेण्यात येणार आहे. या कॅम्पमध्ये कुणबी प्रमाणपत्र (kunbi caste certificate latest news) वितरित करण्यात येणार आहेत अशी सुचना जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singrauli News: म्हैस चक्क घराच्या छतावर चढली|VIDEO

Beed Crime : बीडमध्ये भयंकर घडलं! उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेला बेदम मारहाण

Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब? केंद्र सरकारची नवी योजना? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : बीडमध्ये साळेगावजवळ कार पलटी झालेल्या अपघातात दोघे जखमी

SCROLL FOR NEXT