Sonpeth Police Accident Saam TV
महाराष्ट्र

Parbhani News: ड्युटी संपवून घरी निघाले, पण वाटेतच मृत्युने गाठलं; कारच्या धडकेत पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

Parbhani Accident News: भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पोलीस निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला.

राजेश काटकर

Parbhani Police Accident

परभणी जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पोलीस निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना भारसावडा गावानजीक रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रभाकर गवारे, असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. या भीषण अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. अपघातानंतर स्कार्पिओ कार देखील आगीत जळून खाक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर गवारे हे सोनपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. (Latest Marathi News)

रविवारी सायंकाळी ते कर्तव्य बजावून दुचाकीवरून मानवत येथील (Parbhani News) घरी जात होते. दरम्यान, भारसवाडा जवळील पोखर्णी ते पाथरी रोडवर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भरधाव स्कार्पिओने गवारे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता, की यात गवारे यांची दुचाकी लांबपर्यंत फरफटत गेली. यातच स्कार्पिओने देखील पेट घेतला. गाडीतील चालक व प्रवाशांनी वेळीच बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कर्तव्य बजावून घरी परतणाऱ्या गवारे यांच्यावर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited by - Satish Daud-Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT