Buldhana Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana Crime News: लग्न होत नसल्याच्या निराशेतून मुलाचं जन्मदात्या पित्यासोबत भयंकर कृत्य; मन सुन्न करणारी घटना

Buldhana News: आरोपी मुलास अटक, आडोळ फाटा परिसरातील विटभट्टी वरील घटना...

संजय जाधव

Buldhana News : जळगावजामोद तालुक्यातील पिंपळगांव काळे येथून जवळच असलेल्या आडोळ फाटा शिवारा येथील हरी दयाराम तायडे यांच्या विट भट्टीवर काम करणाऱ्या मुलाचे वयाचे चाळीस वर्षे झाले तरी वडील लग्न करून देत नाही या वादावरून पिता पुत्रामध्ये शाब्दीक चकमक झाली. (Latest Marathi News)

या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. मुलगा भानसिंग भैरड्या वय ४० याने पिता नानासीग भैरड्या वय ६० यांचे डोक्यात काठीने मारहाण केली. यातच पित्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहीती कामावरील मजुराने विट भट्टी मालक मयूर हरी तायडे यांना फोन वरून दिली. तर या घटने प्रकरणी मयूर हरी तायडे यांनी पोलीस स्टेशन जळगांवजामोद येथे फिर्याद दाखल केली आहे. (Buldhana Crime)

पितापुत्र कहुपट्टा जामोद परीसरातील आदिवासी असून वीट भट्ट्यावर मजूरीचे काम करतात. या प्रकरणी आरोपी मुलास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली राऊत मेजर करीत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT