Hingoli News Saam TV
महाराष्ट्र

Hingoli News : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासूरवाडीमधून हरवला जावई; 10 दिवसांनी सापडला भलत्याच ठिकाणी

Son-in-law missing Case : मांडव परतणीसाठी आलेला जावई गावातून अचानक गायब झाला होता. जावयाला शोधण्यासाठी सासरच्या मंडळींनी आख्खं गावं पिंजून काढलं होतं. मात्र जावयाचा शोध लागत नव्हता.

Ruchika Jadhav

भरत नागरे

हिंगोलीमध्ये सासूरवाडीमधून अचानक बेपत्ता झालेल्या नवविवाहित जावयाचा हिंगोली पोलिसांनी शोध घेतला आहे. मांडव परतवणीसाठी आलेला जावई गावातून अचानक गायब झाला होता. जावयाला शोधण्यासाठी सासरच्या मंडळींनी आख्खं गावं पिंजून काढलं होतं. मात्र जावयाचा शोध लागत नव्हता. अशात तब्बल १० दिवसांनी या जावयाचा शोध लागला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कोठारी गावामध्ये ही घटना घडलीये. प्रमोद मातरे असं बेपत्ता झालेल्या जावयाचं नाव आहे. 21 एप्रिल रोजी त्याचा विवाह संपन्न झाला होता. विवाहानंतर वाजत गाजत नवरदेव नवरीला आपल्या घरी घेऊन आला. सर्वजण आनंदी होते. गृहप्रवेश देखील मोठ्या आनंदात पार पडला. त्यानंतर नवरी परंपरेप्रमाणे परतावणीसाठी पुन्हा गावी गेली.

माहेरी गेलेल्या पत्नीला पुन्हा आपल्या घरीव नेण्यासाठी नवरदेव आपल्या काही मित्रपरिवार आणि नातेवाईकांसह सासरी पोहचला. पत्नीला घरी आणल्यानंतर सुखाने संसार थाटायचा या विचारात तो तिथे पोहचला. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. जावयाने सासरच्या गावात एन्ट्री तर केली, पण तो घरी पोहचलाच नाही.

मांडव परतणीसाठी सासूरवाडीच्या दिशेने निघालेला जावाई सासुरवाडीत पोहोचताच अचानक बेपत्ता झाला. जावई घरी न आल्याने नवरी आणि तिच्या कुटुंबियांच्या मनात एकच भीती वाढू लागली. त्यानंतर नातेवाईकांनी हिंगोली पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्यांच्या गावासह अन्य गावांमध्ये देखील जावयाचा शोध घेतला.

त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि हरवलेल्या जावयाला नांदेड येथून ताब्यात घेत कुटुंबाच्या स्वाधीन केले. दरम्यान, सासरवाडीमधून अचानक बेपत्ता झालेल्या जावई प्रकरणात कुरुंदा पोलीस आता बारकाईनं तपास करत आहेत. जावई नेमका कुठे गेला होता. तो स्वत: निघून गेला होता? वाट चुकला होता, की त्याला कुणी दुसरीकडे नेलं होतं? असे अनेक प्रश्न या प्रकरणात उभे राहिले आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Sambhajinagar Crime: विश्वास नांगरे पाटील यांच्या AI चेहऱ्याआडून मोठी फसवणूक, सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ७८ लाखांचा गंडा

Gold Rates: सोन्याला चकाकी! भावात वाढ झाली की घसरण? सोनं खरेदीपूर्वी वाचा आजचे लेटस्ट दर

LIC Scheme: LIC ची भन्नाट योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १ लाखांची पेन्शन मिळवा

Car Tire Pressure: पावसाळ्यात गाडीच्या टायरचा योग्य दाब किती असावा? गाडी चालवताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT