solapur, crime news, mother, son, hospital saam tv
महाराष्ट्र

Crime News : जन्मदातीवर मुलाचा चाकू हल्ला; आईची मृत्यूशी झुंज

आईने सुफीयानला सोलापूर आणि पुणे येथील प्रसिद्ध अशा मनोरुग्ण डॉक्टरांकडे दाखवले होते.

विश्वभूषण लिमये

Solapur Crime News : साेलापूर शहरातील एका मुलानं आपल्या आईवर (mother) जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यानंतर नातेवाईकांनी संबंधित महिलेस तातडीने रुग्णालयात (hospital) दाखल केले. मृत्यूशी झुंज देणा-या महिलेचा मूलगा हा मनाेरुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. (Maharashtra News)

लॉकडाऊनचा फटका अनेकांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे सोलापूर शहरातील इंजिनिअर असलेला सुफीयान शेख हा मानसिक रोगी झाला होता. आज (बुधवार) सकाळी त्याने जन्मदाती आई जरीना अस्लम शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. घरात ठेवलेल्या चाकुने तब्बल तीन वार करत त्याने आईला भोकसलं. नातेवाईकांनी ताबडतोब जखमी जरीना यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेे. जरीना या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे. (Solapur Latest Marathi News)

जरीना या आज घरात सकाळी रोजच्या प्रमाणे झाडू मारत होत्या. सुफीयान हा आईवर अज्ञात कारणावरून चिडून होता. घरात कोणी नसल्याची संधी साधत त्याने घरातील चाकु घेतले आणि पाठीमागून येत आईवर जीवघेणा हल्ला केला. मानेवर,पाठीवर आणि कंबरेवर असे तीन वेळा त्याने आईला चाकूने भोकसलं आणि तेथून पळ काढला. त्यानंतर तो स्वतः जेलरोड पोलीस ठाण्यात हजर झाला. (Latest Marathi News)

दरम्यान सुफीयानने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल आहे. पण गेल्या दोन वर्षांपासून तो मानसिक त्रासाने ग्रस्त होता. आईने सुफीयानला सोलापूर आणि पुणे येथील प्रसिद्ध अशा मनोरुग्ण डॉक्टरांकडे दाखवले होते. त्यावर उपचार देखील सुरू होते.

त्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन पासून तो मानसिक रोगी झाला होता. मानसिक त्रासात सुफीयानने दोन ते तीन वेळा विचित्र असे कृत केले होते. घरातील इतर नातेवाईक त्याची मोठी काळजी घेत होते. लॉकडाऊन पर्यंत त्याची मानसिक परिस्थिती चांगली होती पण लॉकडाऊनपासून त्याची मानसिक परिस्थिती बिघडली होती अशी माहिती बाबा मिस्त्री (समाजसेवक) यांनी देखील दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT