Soldier Saam Tv
महाराष्ट्र

नाशिकचे सुपुत्र जवान अमोल पाटील यांना नेपाळ सीमेवर वीरमरण

या घटनेची माहिती समोर येताच गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक - बिहारमधील नेपाळच्या सीमेलगत बिरपूर याठिकाणी शुक्रवारी (21 जानेवारी) मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण तीन जवानांचा वीरमरण आले आहे. या घटनेत अन्य 10 जवान गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नेपाळच्या सीमेवर घडलेल्या या दुर्घटनेत नाशिकमधील (Nashik) बोलठाण येथील एका जवानाला वीरमरण आले आहे. या घटनेची माहिती समोर येताच गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. (Soldier From Nashik Died)

हे देखील पहा -

अमोल हिंमतराव पाटील असं मृत जवानाचं नाव आहे. अमोल हे नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील रहिवासी होते. मृत अमोल यांची सहा वर्षांपूर्वी सशस्त्र सीमा दलात निवड झाली होती. ते बिहार नेपाळ येथील सुपौलच्या बिरपूर सीमेवर कार्यरत होते. दरम्यान शुक्रवारी सशस्त्र सीमा बलाच्या 45 व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षणार्थी सैनिकांचं प्रशिक्षण सुरू होतं. यावेळी 11 केव्ही उच्चदाब प्रवाहाच्या तारेचा धक्का लागून मोठी दुर्घटना घडली आणि यामध्ये 3 जवानांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य 10 जवान गंभीर जखमी आहेत.

दरम्यन, अमोल हे अलीकडेच दिवाळीसाठी आपल्या गावी आले होते. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. त्यानंतर ते आपल्या आईसह पत्नी आणि मुलीला आपल्या सोबत घेऊन गेले होते. पण शुक्रवारी घडलेल्या दुर्घटनेत त्यांना वीरमरण आलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT