महाराष्ट्र

मुख्याध्यापकानं आधी दोन मुलं,पत्नीला मारलं नंतर स्वतः केली आत्महत्या; सोलापुरातील धक्कादायक घटना

Family Mass End Life In Barshi: सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुख्याध्यापकाने आपली पत्नी आणि दोन मुलांसह कथितरीत्या आत्महत्या केली. पोलिसांना २२ पानांची चिठ्ठी सापडली आहे.

Bharat Jadhav

  • बार्शी तालुक्यात मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली.

  • घटनास्थळी पोलिसांना २२ पानांची सुसाईड नोट मिळाली आहे.

  • शेअर मार्केटमधील मोठ्या तोट्यामुळे सुमारे १.८० कोटी रुपयांचे कर्ज झाल्याची माहिती.

सोलापूरच्या बार्शी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका मुख्याध्यापकाने आपल्या दोन मुलांची आणि पत्नीची हत्या केली. त्यानंतर स्वता:ने आत्महत्या केली आहे. मुख्याध्यापक योगेश पाटील, पत्नी माधुरी, मुले अथर्व आणि शिवांश अशी मृतांची नावे आहेत. बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात ही कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिसांना 22 पानांची सुसाईड नोट मिळाली आहे. या कर्जाच्या विवंचनेतूनच त्यांनी संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे .

प्राथमिक माहितीनुसार, मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले होते. त्यात त्यांना मोठं नुकसान झालं होतं. शेअर्स मार्केटमुळे त्यांच्यावर तब्बल १ कोटी ८० लाख रुपयांचं कर्ज झालं होतं. त्याच कर्जापायी मुख्याध्यापक आणि त्यांच्या कुटुंबाने जीवन संपवल्याचा निर्णय घखेतल्या असावा असं म्हटलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update : राज्यसभेत अमित शहांना बोलवा - मल्लिकार्जुन खर्गे

Auto Taxi Marathi Rule : मराठी आलं नाही तर लायसन होणार रद्द! आज येणार शासनाचा मोठा निर्णय; परिवहन मंत्र्यांची माहिती

Society Rule : सोसायटीत जिम अन् स्विमिंग पूलचे वेगळे पैसे घेतले जातायत? मग ही बातमी नक्की वाचा, तुमचे हक्क काय सांगतात

Gen alpha club: 'बस सुरू करा, नाहीतर आमचं शिक्षण थांबेल'; जालन्यातील विद्यार्थिनींचा थेट रस्त्यावर उतरून सवाल

SCROLL FOR NEXT