Solapur Rain News Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Rain News: लग्नात बरसल्या पावसाच्या सरी, हॉलला स्विमिंग पूलचे स्वरूप; नवरदेवाची उडाली भंबेरी (पाहा व्हिडिओ)

Solapur Unseasonal News: सोलापूरमध्ये एका लग्नाच्यावेळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

विश्वभूषण लिमये

Solapur Marriage News: राज्यात अवकाळी पावसाने धुडगूस घातला आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यात लग्नाची मोठी लगबग सुरू आहे. सोलापूरमध्ये एका लग्नाच्यावेळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक विस्मरणीय क्षण. नवरा-नवरीसह दोन्हीकडील मंडळी काही दिवस आधापासूनच मोठ्या उत्साहात तयारी सुरु करतात. सोलापुरात एका जोडप्यानंही आपल्या लग्नाचं असंच स्वप्न पाहिलं. मात्र या जोडप्याच्या स्वप्नांवर अवकाळी पावसाने (Rain) पाणी फेरल आहे. (Latest Marathi News)

रमजान सण संपला की मुस्लिम धर्मीयत लग्न (Marriage) सराईचा काळ सुरू होतो. रमजान सणानंतर अनेक उतावीळ नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून थांबलेले असतात. शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने सोलापुरात (Solapur) धुमाकूळ घातला होता. शहरातील अनेक मंगलकार्यालयात लग्न सराई सुरू आहेत.

यातच सायंकाळच मुहूर्त असलेल्या लग्नला पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. शहरातील अशोक चौक परिसरात असलेल्या एका मंगल कार्यालयात अवकाळी पावसाचे पाणी शिरले. वऱ्हाडी, नवरदेव आणि नववधू यांची मोठी फजिती झाली. मंगल कार्यालयात पाणी शिरल्याने सर्वांना खुर्चीवर थांबावे लागले. (Solapur News)

हातात कट्यार, पायात मोजडी, अंगावर जोधपूरी ड्रेस घातलेल्या नवरदेवाला देखील खुर्चीचा आधार घेत खुर्चीवर थांबावे लागले. सोलापूर शहरातील अशोक चौक परिसरातील एका मंगल कार्यालयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच वायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT