Solapur Train Robbery Saam Tv
महाराष्ट्र

Solapur: सोलापूर हादरले! पहाटे ट्रेनवर थरारक दरोडा, प्रवाशांना मारहाण; महिलांनाही सोडलं नाही, मोबाईल अन् दागिने लुटले

Solapur Train Robbery: सोलापूरमध्ये पॅसेंजर ट्रेनवर दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण केली. यावेळी त्यांनी महिलांनाही सोडले नाही.

Priya More
  • तडवळ रेल्वे स्थानकावर उभ्या ट्रेनवर दरोडा

  • यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटे दरोडा टाकण्यात आला

  • दरोडेखोरांनी महिलांसह प्रवाशांना मारहाण केली

  • रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने लुटल्याचा आरोप

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूरमध्ये ट्रेनवर दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तडवळ रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. रेल्वे स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसवर पहाटेच्या सुमारास थरारक दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी महिलांसह प्रवाशांना मारहाण करत रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने लुटल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.

तडवळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटे दरोडा पडला. पहाटे २.४९ ते ४.०३ या कालावधीत ट्रेन तब्बल ७४ मिनिटे स्थानकावर उभी होती. हीच संधी साधून ४ ते ६ अज्ञात दरोडेखोरांचा रेल्वेच्या डब्यांमध्ये प्रवेश केला. एस-४,एस-६ आणि एस-७ डब्यांतील प्रवाशांना दरोडेखोरांनी लक्ष्य केलं. महिलांसह प्रवाशांना मारहाण करून रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने लुटण्यात आले. यावेळी विरोध करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले.

या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांवर सोलापुरात उपचार सुरू आहेत. सोलापूरचे महेश पवार यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे ५ तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावण्यात आली. चोरीला गेलेल्या सोन्याची किंमत सुमारे १ लाख ४३ हजार ५०० रुपये इतकी आहे. अन्य तीन प्रवाशांचे मोबाईल, रोख रक्कम आणि मौल्यवान साहित्य चोरट्यांनी लंपास केले. दरोडेखोरांनी काही ठिकाणी खिडक्यांमधून हात घालून, तर काहींनी थेट डब्यात घुसून लूट केली.

या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि पोलिसांची धावपळ झाली. या दरोड्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. सर्वजण घाबरून होते. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अज्ञात दरोडेखोरांचा शोध पोलिस घेत आहेत. पुढील तपास सोलापूर रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer Death : प्रसिद्ध गायिकेचं निधन, संगीत विश्वावर शोककळा

Accident: मॉलमध्ये मोठी दुर्घटना, शटरिंग अंगावर पडलं; ३ जणांचा जागीच मृत्यू

New Cancer therapy: आता पुन्हा कॅन्सर होण्याची चिंता मिटणार? तज्ज्ञांनी शोधणी नवी थेरपी, शरीरात असं करेल काम!

Maharashtra News Live Update: संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेर राहुल गांधी यांचं आंदोलन

Shocking : नांदेड हादरलं! १० वर्षीय विर्द्यार्थिनीवर शाळेत अत्याचार; मुख्यध्यापकाने जबरदस्ती केली अन्...

SCROLL FOR NEXT