Ajit Borkar sword attack Solapur saam
महाराष्ट्र

Crime : सोलापूर हादरले! शेतकरी नेत्यावर तलवारीने सपासप वार, स्कॉर्पिओमधून आले अन्...

Ajit Borkar, Solapur Crime News : सोलापूरमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यावर तलवार आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Namdeo Kumbhar

भारत नागणे | साम टीव्ही | सोलापूर प्रतिनिधी

Ajit Borkar sword attack Solapur : सोलापूरमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्यावर तलवारीने खुनी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात अजित बोरकर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अकलूज येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. (Ajit Borkar sword attack Solapur, Farmer leader attacked in Malshiras)

गावातील स्थानिक दोन गटांतील वाद सोडवण्याचा प्रयत्न केल्याच्या रागातून संशयित आरोपींनी बोरकर यांच्यावर हा हल्ला केल्याची फिर्याद अकलूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक तैनात केले आहे.

अजित बोरकर यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्यामुळे माळशिरस तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अकलूज पोलीस अधिक तपास करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

नेमकी घटना कशी घडली?

१९ जून रोजी सायंकाळी अजित बोरकर हे त्यांच्या निमगाव पाटी येथील कार्यालयासमोर मित्रांसोबत बोलत उभे होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या एका स्कॉर्पिओ गाडीमधून आलेल्या संशयित आरोपी सोमनाथ रुपनवर, आर्यन बोरकर, रणजीत बोरकर, गणेश जानकर आणि गणेश मंडले यांच्यासह इतर तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याजवळ येऊन, "तू आमच्या वादात का पडतोस?" असा जाब विचारला. त्यानंतर या सर्वांनी मिळून बोरकर यांच्यावर तलवार आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या मारहाणीत बोरकर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या खांद्यावर आणि कमरेवर खोलवर जखमा झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veen Doghantali Hi Tutena Video : "तु माझी मी तुझा गं सात जन्मभर..."; वटपौर्णिमेला समर-स्वानंदीच्या नात्यांची वीण आणखी घट्ट होणार, प्रेमाला बहर येणार

Maharashtra News Live Update : चाकण एसटी बसस्थानकाची दुर्दशा; कचरा आणि भाजीमंडईमुळे प्रवाशांचे हाल

MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जागा थेट २६५ वर; 'या' दोन मोठ्या पदांचा समावेश

Vidhan Parishad Election 2026 : राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांचा निकाल जाहीर होणार, कोण मारणार बाजी?

Ladki Bahin Yojana : महिना संपायला अवघे ८ दिवस बाकी; जूनचा हप्ता कधी जमा होणार? लाभार्थी महिलांमध्ये ₹१५०० ची उत्सुकता

SCROLL FOR NEXT