Solapur : लॉजच्या रूममध्ये विवाहित प्रेमी युगुलाची आत्महत्या, मोहोळमधील घटना! SaamTv
महाराष्ट्र

Solapur : लॉजच्या रूममध्ये विवाहित प्रेमी युगुलाची आत्महत्या, मोहोळमधील घटना!

अश्विनी पुजारी व धनंजय गायकवाड हे दोघेही विवाहीत असुन दोघांचाही आपआपल्या घरी सुखी संसार सुरू होता.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

सोलापूर : सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित प्रेमी युगुलाने लॉजच्या रूममध्ये दोरी व ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे-सोलापूर महामार्गावर लांबोटी गावाच्या हद्दीत दिनेश रामचंद्र गाडे (रा.मोहोळ) यांच्या मालकीचा 'रॉयल-इन-वन रेस्टारंट अँड लॉजिंग' नवणारे परमीटरुमचा  व्यवसाय आहे. सोमवार (27 सप्टेंबर) रोजी सायकांळी साडेसहाच्या सुमारास  अश्विनी बिराप्पा पुजारी व धनजंय बाळु गायकवाड  (रा. लोणीकंद, ता.हवेली, जि.पुणे) हे दोघेजण सदर हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आले. लॉजच्या काउंटरवर रीतसर ओळखपत्र प्रत घेऊन रूमसाठी नोंदणी करून या जोडप्यास रूम देण्यात आली.

हे देखील पहा :

हॉटेल कामगार माधव दत्तात्रय सोनसाळे याने या जोडप्यास रूम उघडून दिली व रात्री पावणे बाराच्या सुमारास आम्हाला जेवण पाठवून द्या असे या जोडप्याने माधव यास सांगितले. सांगितल्याप्रमाणे माधव सोनसाळे हा जेवण देण्याकरता रूमजवळ गेला व दरवाज्याबाहेरची बेल वाजवली, बऱ्याचदा बेल वाजवूनही आतून काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे शंका आल्याने त्याने रूमच्या खिडकीतून आतमध्ये पहिले असता, धनंजय बाळू गायकवाड व अश्विनी बिराप्पा पुजारी यांनी गळफास घेतल्याचे सोनसाळे याला आढळून आले. सदर घटनेची माहिती सोनसाळे याने हॉटेल मालक अनिल गाडे याला दिली. त्यावेळी गाडे व त्याचा मित्र वैभव बाळासाहेब कदम या दोघांनी देखील घटनेची पाहणी केली, यावेळी आतून कडी लावली असल्याचे व अश्विनी व धनजंय यांनी गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घटनेबाबत अनिल गाडे याने मोहोळ पोलीस स्टेशनला येऊन घटनेची माहिती दिली. मोहोळ पोलीसांनी घटनास्थळी जाऊन रूमचा दरवाजा तोडून आत्महत्या केलेल्या दोघांना पाहीले असता अश्विनी पुजारी हीने दोरीच्या साहाय्याने तर धनंजय गायकवाड याने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. यावेळी अश्वीनी हीच्या गळ्याची दोरी तुटल्याने ती खाली पडली होती. तर, धनंजय हा तसाच लटकलेला होता व त्याचे दोन्ही पाय अश्वीनीच्या शरीराला स्पर्श झाले होते. अश्विनी पुजारी व धनंजय गायकवाड हे दोघेही विवाहीत असुन दोघांचाही आपआपल्या घरी सुखी संसार सुरू होता.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

X युजर्स सावधान! हे नियम पाळा नाहीतर तुमचंही अकाउंट होईल Delete

SCROLL FOR NEXT