Walmik Karad Son Sushil Karad saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad: वाल्मिक कराडच्या मुलाला मोठा दिलासा, सोलापूरात गुन्हा दाखल करता येणार नाही; कोर्टाचे आदेश

Walmik Karad Son Sushil Karad: वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली होती. हा गुन्हा सोलापूरच्या हद्दीत येत नाही त्यामुळे त्याच्याविरोधात सोलापूरमध्ये गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे कोर्टाने सांगितले आहे.

Priya More

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या मुलाला मोठा दिलासा मिळाला आहे. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. हा गुन्हा सोलापूरच्या हद्दीत येत नाही असे कोर्टाने स्पष्ट केले आहेत.

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या विरोधात एका महिलेने सोलापूरमध्ये तक्रार दाखल केली होती. दाखल केलेल्या खासगी तक्रारीनुसार संपूर्ण घटनाक्रम हा बीड जिल्ह्यातले असल्याने पीडित महिलेने बीड जिल्हा न्यायालयात दाद मागावे अशे आदेश सोलापूर न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सुशील कराडला काहीसा दिलासा मिळाला आहे.

सुशील कराड प्रकरणातील फिर्यादीचे वकील विनोद सूर्यवंशी यांनी सांगितले की, 'कोर्टाने आदेश दिला की, सदरचा गुन्हा सोलापूर न्यायालयीन स्थळ सीमेत येत नाही. तेथील न्यायालयीन घटना जे परळी येथील आहे. तेथील योग्य त्या न्यायालयात जाऊन दाद मागावी असे आदेश केलेले आहेत. या घटनेमधील दोन्ही घटना सोलापूरमध्ये घडलेल्या होत्या त्यामुळे आम्ही न्यायालयीन स्थळ सीमेचा जो मुद्दा आलेला आहे त्यामध्ये आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहोत.'

तसंच, 'यामध्ये पोक्सोअंतर्गत २१ प्रमाणे जर का पाहिलं तर पोक्सो गुन्ह्याबद्दलची माहिती दिली. पोलिसांना जर का ही माहिती कळवली तर २४ तासांच्या आत त्यांनी गुन्हा नोंद करून घ्यायला पाहिजेल होता. परंतू पोलिसांनी असं कोणताही प्रकारचा गुन्हा नोंद करून घेतले नाही. आता या सर्वबाबी आम्ही निदर्शनास आणून दिलेले होत्या. सदरचा गुन्हा न्यायालयीन स्थळ सीमेत नसल्यामुळे परळी येथील न्यायालयात दाद मागण्याचे आदेश केलेला. त्याविरोधी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT