Barshi Underage Girl Marriage News saam tv
महाराष्ट्र

Solapur News: अल्पवयीन मुलीनं बाळाला जन्म दिला; पतीसह सासू, सासरा आणि आई-वडीलांवर गुन्हा दाखल

Underage Girl Gave Birth To Child In Solapur : या अल्पवयीन मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

Chandrakant Jagtap

Barshi Underage Girl Marriage News: बार्शी तालुक्यातील एका गावातील मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिचे आई-वडिल आणि सासू-सासरे यांनी तिचे लग्न लावलं. तीन वर्षांनंतर तिने एका बाळाला जन्मही दिला. मात्र आता ती मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. सोलापूर येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्यामुळे मुलीचे आई-वडील, पती, सासू आणि सासरा अशा पाच जणांविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण, बालविवाह प्रतिबंधक नियम, महिलांवर अत्याचार आदी कलमांनुसार बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस नामदार शबाना कोतवाल यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर ५ एप्रिल २०२३ रोजी ही घटना उघडकीस आली. मिलालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीचा विवाह १६ एप्रिल २०२० रोजी तिच्या घरासमोर लावून देण्यता आला. लग्नाच्या तीन वर्षांनतंर तिला एक मुलगीही झाली. यानंतर ती पुन्हा सात माहिन्यांची गर्भवती होती. दरम्यान तिला अचानक तीव्र प्रसुती वेदना होऊ लागल्या. त्यामुळे ३ एप्रिल रोजी तिला बार्शीतील येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Solapur News)

तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करुन ४ एप्रिल रोजी सोलापूर येथील दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. सोलापूर येथे तिची आपतकालीन परिस्थितीत प्रसूती करण्यात आली. तिने एका गोड मुलीला जन्ह दिला. परंतु आता तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्या पतीकडे मुलीचे आधारकार्ड मागितले. तेव्हा तिची जन्मतारीख १० जानेवारी २००६ असल्याचा खुलासा झाला. तिला १७ वर्षे पूर्ण होऊन १८ वे वर्षे सुरु असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. दरम्यान अल्पवयीन मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे तपास करीत आहेत. (Latest Marthi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT