Solapur news  Saam tv
महाराष्ट्र

Video : फक्त एका कारणावरून आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण? सोलापूर विद्यापीठातील व्हिडिओ आला समोर

सोलापूर विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूरमधून एक वृत्त मोठं समोर आलं आहे. सोलापूर विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. सिनेट सभा उधळून प्रयत्न लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर (Solapur) विद्यापीठात विद्यार्थ्याकडून आंदोलन करण्यात येत होते. याच विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिनेट सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण केल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांना पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडिओ विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी काही आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय घडलं?

सोलापूर विद्यापीठात बार्शीतील महाविद्यालयाने काही विद्यार्थ्यांना डी बार केल्याने कुलगुरूंकडे याबाबत दाद मागण्यासाठी आंदोलन सुरु होते. मात्र, आंदोलक विद्यार्थ्यानी आक्रमकपणा दाखवण्यास सुरूवात केल्याने विद्यापीठातील सिक्युरिटी गार्ड आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, विद्यार्थ्यांचे आंदोलन पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झाला आहे.

तर या प्रकारानंतर विद्यार्थ्यांकडून विद्यापीठातील सिक्युरिटी गार्ड आणि पोलिसांकडून विद्यार्थ्यांनी गच्ची पकडण्याचा कांगावा करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. आमच्या आंदोलनाचा धसका घेऊन पोलिसांनी खोटे आरोप केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे.

सोलापूर विद्यापीठातील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेराव घातला आहे. पोलीस आंदोलक विद्यार्थ्यांना दमदाटी करताना दिसत आहे. तर पोलीस कर्मचारी हे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठी उगारताना दिसत आहे. दरम्यान, आंदोलक विद्यार्थ्यांना फौजदार चावडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Bhosle Photos: निळ्या पैठणी साडीमध्ये रूपालीचा मराठमोळा साज, फोटो पाहाच

Maharashtra Live News Update: नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी?

रिल्ससाठी जीव घातला धोक्यात, कारच्या टपावर फटाके फोडले अन्...; पाहा व्हिडिओ नेमकं काय घडलं?

Madhura Joshi Photos: मधुराच्या साडीतील सेल्फिने केले घायाळ, पारंपारिक लूक पुन्हा चर्चेत

Mumbai Shocking Accident : हृदयद्रावक! फिरायला गेली अन् परत आलीच नाही, आई - वडिलांसमोर दुचाकीस्वाराने दीड वर्षाच्या मुलीला चिरडलं

SCROLL FOR NEXT