Solapur Police Saam tv
महाराष्ट्र

Solapur Police : जन्मठेप शिक्षेत पॅरोल रजेवर बाहेर येताच झाला फरार; चार पिस्तूलांसह अडकला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

Solapur news : रत्नागिरीच्या शिवाजीनगर परिसरातील फाईक मुस्ताक कळमबेकर याला खूनाच्या गुन्ह्यात रत्नागिरीमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर आणखी दोन गुन्हे देखील दाखल आहेत

विश्वभूषण लिमये

सोलापूर : खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर घरी आला आणि तेथून आरोपी फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत असताना या आरोपीला सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारासह अटक केली आहे. त्यांच्याकडे असलेले चार देशी बनावटीचे पिस्टल व २४ जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आली आहेत.

रत्नागिरीच्या शिवाजीनगर परिसरातील फाईक मुस्ताक कळमबेकर याला खूनाच्या गुन्ह्यात रत्नागिरीमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर आणखी दोन गुन्हे देखील दाखल आहेत. तर निंबोडा हनुमंत बिराजदार याला मंगळवेढ्यात एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा असून तो सध्या जामिनावर आहे. तसेच राजकुमार हनुमंत बिराजदार हा त्यांच्यासोबत असलेला साथीदार या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांना मिळाली माहिती 
राज्यात सध्या परवानाधारक व अवैध अग्निशस्त्र वापरून होत असलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क आहे. त्यानुसार सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिस देखील सतर्क होते. सोलापूर ग्रामीण पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार फारूक कळमबेकर हा एक देशी बनावटीचे पिस्टल मॅक्झिन व जिवंत काडतुससह मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथे राहत असल्याची माहिती मिळाली. 

सापळा रचून तिघेजण ताब्यात 

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथे सापळा लावून आरोपी फारूक कळमबेकर याच्यासह निंबोडा बिराजदार व राजकुमार बिराजदार या दोन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. तसेच या आरोपीकडून चार पिस्तूल व २४ जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT