Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur News : टोल न देता बॅरिकेड्स तोडून निघालेल्या ट्रकने सुरक्षा कर्मचाऱ्याला चिरडलं; पेनूर टोलनाक्यावरील घटना

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ ते पंढरपूर पालखी मार्गावरील पेनूर टोल नाका आहे. या नाक्यावर पहाटे पाच वाजेच्या सुमारास हि घटना घडली आहे.

विश्वभुषण लिमये

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ ते पंढरपूर या मार्गावर आज पहाटेच्या सुमारास धक्कादायक घटना समोर आली आहे. या मार्गावरील टोल नाक्यावर टोल न भरता बॅरिकेड्स तोडून ट्रक मार्गस्थ झाला होता. या ट्रकला थांबवण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला चिरडल्याची घटना घडली. या या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. 

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ ते पंढरपूर पालखी मार्गावरील पेनूर टोल नाका आहे. या नाक्यावर पहाटे पाच वाजेच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेत हनुमंत अंकुश माने या टोल कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मोहोळ- पंढरपूर या पालखी मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडून टोल वसूल केला जात असतो. दरम्यान पहाटे मालवाहू ट्रक आला असता, चालकाने (Toll Plaza) टोल भरणा करण्यासाठी ट्रक टोल नाक्यावर न थांबविता, बॅरिकेड्स तोडून घेऊन भरधाव वेगाने मार्गस्थ झाला.  

दरम्यान टोल न भरताच ट्रक जात असल्याचे पाहून टोल नाक्यावरील कर्मचारी त्याला थांबविण्यासाठी धावले. मात्र चालकाने ट्रक वेगानेच काढला. यावेळी काही कारभारी बाजूला झाले. मात्र हनुमंत माने याला धक्का लागल्याने खाली पडून ट्रकच्या चाकाखाली सापडला. यात त्याचा मृत्यू झाला. संबंधित ट्रक चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला असून मोहोळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान हि थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याण डोंबिवलीत भाजपचे 14 तर शिंदेसेनेचे 6 बिनविरोध, मनसेच्या दिग्गज उमेदवाराचा अर्ज मागे, महायुतीची विजय एक्सप्रेस सुसाट

Maharashtra Live News Update: मतदानापूर्वी भाजपचा पिंपरी चिंचवड शहरात दूसरा विजय

New Year Diet Plan: नवीन वर्षात वजन कमी करायचंय? हे सोपे Diet करा फॉलो, महिनाभरातच दिसेल फरक

No Makeup Look: मुलीनों, अंघोळ केल्यानंतर फक्त या '5' टिप्स फॉलो करा , मेकअप न करता दिसाल गोऱ्यापान

Mumbai Metro : मुंबई मेट्रोवर 'नागिनचा' कब्जा, प्रवाशांना थक्क करणारा अनुभव, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT