Solapur news Police Constable Rahul Shirsat Death latest marathi update Saam TV
महाराष्ट्र

Solapur News: पोलीस कॉन्स्टेबलची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; ऐन दिवाळीत कुटुंबावर शोककळा

Solapur News: केशवनगर पोलीस लाईन परिसरात एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहुल शिरसाट असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur Police Constable News

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केशवनगर पोलीस लाईन परिसरात एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहुल शिरसाट असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनेची माहिती कळतात वरिष्ठ अधिकारी आणि सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत राहुल शिरसाट यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. ऐन दिवाळीत उत्साही वातावरण असताना शिरसाट यांनी इतकंच टोकाचं पाऊल का उचललं? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत राहुल शिरसाट सोलापूर पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर जाणार होते. मात्र, त्याआधी राहुल यांनी स्वत:वर गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या आत्महत्येने शिरसाट कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, पोलिसांनी राहुल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेनं पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक, तिघांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Best Bus Accident : बेस्ट बसला भीषण अपघात; पुढच्या भागाचा चक्काचूर, ब्रिजवर नेमकं काय घडलं?

दगडूशेठ गणपती मंदिरात महिला भाविकांना १० रुपयांची ओवाळणी भेट|VIDEO

Genelia Deshmukh Photos: जेनेलियाचं स्टनिंग फोटोशूट, मादक अदांनी चाहते झाले घायाळ

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, सह्याद्री पट्ट्यात जोरदार पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT