Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur : Solapur : माणुसकी! बेवारस वृद्धावर मुस्लिम तरुणांकडून अंत्यसंस्कार, हिंदू पद्धतीने केला विधी

Solapur News : वृद्ध इसम मयत अवस्थेत पडलेला आढळला. उष्माघात आणि भूकबळीने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांना व्यक्त केला. मंद्रुप पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली

विश्वभुषण लिमये

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळीमध्ये सापडलेल्या ७५ वर्षीय अज्ञात वृद्धाच्या मृतदेहावर मंद्रूपमधील मुस्लिम तरुणांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या बेवारस मृतदेहावर उस्मान नदाफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक जाणिवेतून हे अंत्यसंस्कार केले आहेत.

दक्षिण सोलापुर तालुक्यातील टाकळी शिवारातील बोदलप्पा मदगौंडा दिवटे यांच्या शेतात २९ मार्चला एका अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला होता. सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी ग्रेड पीएसआय संदीप काशीद यांनी पंचनामा केला. सदर वृद्ध इसम मयत अवस्थेत पडलेला आढळला. उष्माघात आणि भूकबळीने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांना व्यक्त केला. मंद्रुप पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली.

दरम्यान पोलिसांनी त्याची संपूर्ण झडती घेतली. मात्र ओळख पटविणारा एकही पुरावा आढळून आला नव्हता. मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयातील शवागृहात मृतदेह ठेवण्यात आला होता. पोलिसांनी सदर मयताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु शोध घेवूनही त्याची ओळख पटली नाही. त्यामुळे आज पाचव्या दिवशी सदरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.

हिंदू पद्धतीने केला संपूर्ण विधी 

मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयातील शवागृहातून वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड, पोलीस शिपाई संदीप काळे, विशाल कर्नाळकर यांच्या उपस्थितीत बाहेर काढला. मुस्लिम समाजाचे तरुण उस्मान नदाफ, आसिफ शेख, सैफन नदाफ, आरिफ नदाफ यांनी तिरडी बांधली. त्यांना अनिल टेळे, सिद्धाराम कुंभार, मल्लिकार्जुन जोडमोटे,अमोगसिध्द लांडगे, बबलू शेख, शिवराज मुगळे यांनी मदत केली. त्यानंतर मंद्रूप- निंबर्गी रस्त्यावरील स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला. यावेळी हिंदू पद्धतीने सर्व धार्मिक विधी करण्यात आले. उस्मान नदाफ मित्रपरिवार यांनी तिसऱ्यांदा बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT