Solapur NEws Saam Tv
महाराष्ट्र

हृदयद्रावक! विजेचा शॉक लागून सात वर्षीय मुलीचा मृत्यू, खेळताना घडली घटना

शॉक लागलेला खांब महापालिकेचा असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.

साम टिव्ही ब्युरो

सोलापूर : सोलापुरात विजेचा शॉक लागून एका सात वर्षीय लहान मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. नई जिंदगी परिसरातील प्रभाकर नगर येथे ही घटना घडली आहे.

एमन बंदेनिवाज बिराजदार असं मृत मुलीचं नाव आहे. एमन गल्लीत खेळत असताना रस्त्याकडेला असलेल्या विजेच्या खांबाला शॉक लागला. शॉक लागलेला खांब महापालिकेचा असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.  (Latest Marathi News)

घटना घडल्यानंतर एमनच्या घरच्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. एमनच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नई जिंदगी परिसरातीली विजेच्या खांबांबद्दल याआधीही महापालिका आणि महावितरणकडे तक्रारी केल्याची माहिती माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी दिली. मात्र दोन्हींकडे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.आज अखेर खेळत असताना हात लागून एका लहानगिचा मृत्यू झाला.

एमनच्या मृत्यूला महापालिका आणि महावितरण दोन्ही जबाबदार आहेत. कारण तक्रारी करुनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे.अजून किती लोकांचा जीव घेणार आहे. याबाबत महापालिका आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार करुन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याची बाबा मिस्त्री यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Induction Vastu Tips: किचनमध्ये इंडक्शन कोणत्या दिशेला ठेवावा? वास्तुशास्त्रानुसार नियम जाणून घ्या

Maharashtra News Live Update: SIR संदर्भात काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार

घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा! २३ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून 'यलो अलर्ट

Mumbai Police: इंग्लंडवरून महागडे गिफ्ट पाठवतो..., महिला पोलिसाला सायबर भामट्याचा गंडा, ११ लाख लुबाडले

CM फडणवीसांच्या निर्देशानंतर आरोग्यसेवा क्षेत्रात मोठा बदल; ‘या’ परिषद स्थापनेला वेग

SCROLL FOR NEXT