Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur : पूरग्रस्थाची दिवाळी अंधारात; सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत

Solapur News : सरकारकडून नूकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू. सोलापूर जिल्ह्यातील शेतकय्रांना सुमारे ९२७ कोटींच्या मदतीचा शासनाने जीआर काढला. जाहीर केलेल्या पॅकेजमधून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याचे आश्वासन

भारत नागणे

पंढरपूर : अतिवृष्टी आणि महापूरामुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. परिणामी या नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असून त्यांची दिवाळी अंधारातच जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. 

सोलापूरसह राज्यातील शेतकऱ्यांचे महापूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. नूकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी मदत दिली जाईल; असे आश्वासन सरकारने दिले होते. दिवाळी सण संपत आला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकरी शासनाकडून देण्यात येत असलेल्या निधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. 

केंद्र सरकारच्या मदतीकडे बोट 

सरकारकडून नूकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकय्रांना सुमारे ९२७ कोटींच्या मदतीचा शासनाने जीआर काढला आहे. जाहीर केलेल्या पॅकेजमधून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; असे आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले असले तरी त्यांनी केंद्र ससरकारच्या मदतीकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे सरकारची मदत कधी मिळणार याकडेच शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. 

कृषिमंत्र्यांची कबुली 

दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान केंद्र सरकारला नुकसान झालेल्या पंचनाम्याची अचुक माहिती द्यायची असल्याने थोडा उशीर होतो; अशी कुबलीही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्राकडे बोट दाखवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

कृष्णा नदीत सापडला 40 किलोचा महाकाय मासा; बघायला लोकांची मोक्कार गर्दी, VIDEO

विठ्ठलाच्या जागेवर बडव्यांचा दावा; 450 कोटींच्या जमिनीवरून वाद पेटला

MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT