Solapur Airport Saam tv
महाराष्ट्र

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Solapur News : सोलापूरमध्ये होटगी रोड येथे विमानतळ उभारण्यात आले होते. मात्र येथून विमानसेवा सुरु होण्यास अडचणी येत होत्या.

विश्वभुषण लिमये

सोलापूर : सोलापूरकरांची बहुप्रतीक्षित असलेली विमानसेवा आता सुरू होणार आहे. होटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय ९१ एअरलाईन्सची विमानसेवा २० डिसेंबर २०२४ पासून सुरु होणार असून मुंबई आणि गोवा यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट उड्डाणे दिली जाणार आहेत. यामुळे सोलापूरकरांच्या आता स्वप्न साकार होणार आहे. 

सोलापूरमध्ये (Solapur) होटगी रोड येथे विमानतळ उभारण्यात आले होते. मात्र येथून विमानसेवा सुरु होण्यास अडचणी येत होत्या. मात्र अखेर सोलापूरच्या या विमानतळावरून (Airport) उड्डाणांचा मुहूर्त सापडला असून पुढील महिन्यात म्हणजे २० डिसेंबरपासून विमानांचे उड्डाण होणार आहे. अर्थात सोलापूरच्या विकासासाठी एक मोलाची पायरी समजली जात आहे. सोलापूर विकास मंचाच्या नेतृत्वात वर्षानुवर्षे सुरु असलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे. 

सुरु होत असलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचाच्या अथक प्रयत्नांमुळेच हे स्वप्न साकार होऊ शकले आहे. सोलापूरकरांसाठी हे अत्यंत अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण असून मुंबई व गोवा जाणाऱ्यांसाठी हि सेवा सोयीची असणार आहे. शिवाय या सेवेमुळे पर्यटन, उद्योगधंदे आणि व्यापारी क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे.

असे असेल वेळापत्रक 

मुंबईसाठी उड्डाण : सोलापूर - मुंबई सकाळी ९:४० वाजता (स. १०:४० मुंबई आगमन), मुंबई - सोलापूर दुपारी १२:४५ वाजता (दु. ०१:४५ सोलापूर आगमन)
गोवासाठी उड्डाण : सोलापूर - गोवा दुपारी २:१५ वाजता (दु. ३:१५ गोवा आगमन). गोवा - सोलापूर सकाळी ८:१० वाजता (स. ९:१० सोलापूर आगमन).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

Maharashtra News Live Update: पुण्यामध्ये ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

SCROLL FOR NEXT