Solapur Bird Flu Saam tv
महाराष्ट्र

Solapur Bird Flu : सोलापुरात चिकन, अंडी विक्रीस बंदी; बर्ड फ्लूमुळे प्रशासनाचा निर्णय, अहवाल येईपर्यंत निर्बंध लागू

Solapur News : सोलापूर शहरात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून शहरातील कंबर तलाव आणि सिद्धेश्वर तलाव परिसरात कावळा, बगळा, घार या पक्षांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचं आढळून आल्याने खळबळ उडाली

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, श्री सिद्धेश्वर महाराज तलाव, खंदकबाग या परिसरात काही दिवसांपूर्वी 50 हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला होता. या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लू ने झाल्याचे आता स्पष्ट झाल्याने मृत कावळे आढळून आलेले परिसर महापालिका निर्जुंतीकरण केला जात आहे. मृत कावळे आढळून आलेल्या परिसर बंद करण्यात आला असून चिकन व अंडी विक्रीस बंदी घालण्यात आली आहे.

राज्यातील अनेक शहरांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे. यात पक्षी, कोंबळ्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता सोलापूर शहरात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून शहरातील कंबर तलाव आणि सिद्धेश्वर तलाव परिसरात कावळा, बगळा, घार या पक्षांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचं आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. परिणामी महापालिका प्रशासन देखील सतर्क झाले असून उपाययोजना करण्यात येत आहे. 

मृत्यू बर्ड फ्लूमुळेच

मागील काही दिवसात अचानक मृत पावलेल्या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. भोपाळ येथील लॅबमधून मृत कावळ्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून ते बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळल्याने सोलापूर शहरातील स्थानिक प्रशासन आणि पशुसंवर्धन विभाग ॲक्शन मोडवर आले आहे. त्या अनुषंगाने उपाय योजना करण्यात येत आहे.

४ एप्रिलपर्यंत निर्बंध 

दरम्यान मृत पक्षांचा व्हिसेरा भोपाळला तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल येईपर्यंत शहरातील कंबर तलाव आणि सिद्धेश्वर तलाव परिसरातील १ किमीपर्यंतच्या परिसरातील चिकन आणि अंडी विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी अहवाल नकारार्थी येईपर्यंत किंवा ४ एप्रिलपर्यंत असणार आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे आदेश काढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

Building Collapse : भिवंडी हादरली! ४ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT