गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्जप्रकरणी मोठ्या कारवाया केल्याचे समोर आले आहे. मुंबई, नाशिक, पुण्यामधून मोठा ड्रग्जसाठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. आता सोलापूरमधूनही मोठी कारवाई केल्याचे समोर आले असून ड्रग्ज पुरवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश केला आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime) सोलापूरमध्ये मोठी कारवाई केली असून एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या (Solapur) मोहोळ तालुक्यातील चिंचोळीमध्ये एका बंद पडलेल्या एमआयडीसीत हा ड्रग्जचा धंदा सुरू होता. याबाबतची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे या कारखान्यावर छापेमारी करण्यात आली. या कारवाईमध्ये जवळपास १६ कोटी रुपयांचे ८ किलोी एमडी जप्त करण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कच्चा मालदेखील जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण चर्चेत....
दरम्यान, राज्यात सध्या ड्रग्जमाफिया ललित पाटील (Lalit Patil) हे नाव चांगलेच चर्चेत आहे. कोट्यावधी रुपयांच्या ड्रग्जतस्करीचा आरोप असलेला ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून ललित पाटीलशी दादा भुसेंचे (Dada Bhuse) कनेक्शन असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.