Onion saam tv
महाराष्ट्र

Onion: ११०० गाड्या कांद्याची आवक; एक दिवस बाजार समिती राहणार बंद

११०० गाड्या कांद्याची आवक; एक दिवस बाजार समिती राहणार बंद

विश्वभूषण लिमये

सोलापूर : गेल्‍या काही दिवसांपासून कांद्याची आवक मोठ्यात प्रमाणात वाढली आहे. यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज तब्‍बल ११०० गाड्या कांद्याची बंपर आवक झाली आहे. कांद्याची आवक अधिक होत असल्‍याने बाजार समितीने (Market Committee) उद्या एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (solapur news 1100 carts of onion arrives One day the market committee will be closed)

सोलापूर कृषी उत्पन्न समितीच्या (Solapur Market Committee) इतिहासामध्ये मागच्या काही दिवसांपासून विक्रमी कांद्याची आवक होत आहे. सोलापूर (Solapur) बाजार समितीत शेजारील राज्‍यांमधून देखील कांदा येत असतो. दोन दिवसांपूर्वीच ९०० गाड्या कांद्याची आवक बाजार समितीमध्ये झाली होती. तर आज ११०० गाड्या कांद्याची (Onion) विक्रमी आवक झाली आहे. याकारणाने शुक्रवारी एक दिवस कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असणार आहे.

कांद्याचे भाव मात्र स्थिर

बाजार समितीमध्ये जिकडे पाहावं तिकडे कांदाच कांदा दिसून येत आहे. असे असले तरी कांद्याचे भाव अद्याप स्थिर आहेत. सध्या एक नंबर कांद्याला २३०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी आनंदी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League 2026: नॉर्थ मुंबई पँथर्स ‘अजिंक्य’च; ईगल ठाणे स्ट्रायकर्सवरचा पराभव करत मिळवला सलग चौथा विजय

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा, दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार अन्...

Maharashtra News Live Update: बार्शी - सोलापूर मार्गांवर दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात

डोळ्यांच्या 'या' बदलाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, असू शकतं मोठ्या आजाराचं संकेत

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! हे आयडी लगेचच तयार करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा हप्ता विसरा

SCROLL FOR NEXT