Solapur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Solapur News : महाराष्ट्र पुन्हा हादरला! चॉकलेटचे अमिष दाखवून शाळकरी मुलीसोबत संतापजनक कृत्य; दोन वृद्धांवर गुन्हा

Solapur Crime News : चॉकलेट आणि पैशाचे आमिष दाखवून दोन वृद्धांनी 11 वर्षांच्या शाळकरी मुलीचा विनयभंग केला. ही धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली.

विश्वभूषण लिमये

चॉकलेट आणि पैशाचे आमिष दाखवून दोन वृद्धांनी 11 वर्षांच्या शाळकरी मुलीचा विनयभंग केला. ही धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात दोन्ही वृद्धांविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

निळू बळीराम माने (वय 60) आगतराव मुळे (वय 80) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,पीडित अल्पवयीन मुलीचे आई-वडील रोजंदारी करतात. 25 ऑगस्टला देखील ते रोजंदारीसाठी निघून गेले. तेव्हा पीडित मुलगी आणि तिचे भावंड घरी होते.

दरम्यान, पीडिता परिसरात असलेल्या एका किराणा दुकानामध्ये खरेदीसाठी गेली असता, आरोपीने तिचा हात पकडला. तुला चॉकलेट आणि खाऊ देतो असं म्हणत दोघांनीही पीडितेसोबत लगट करण्याचा (Crime News) प्रयत्न केला. त्यांच्या तावडीतून पीडितेने कशीबशी आपली सुटका केली.

सायंकाळी आई-वडील कामावरून परत आल्यानंतर त्यांना मुलगी रडताना दिसली. तेव्हा विचारणा केली असता, पीडितेने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी तातडीने पोलिसांत (Police) धाव घेऊन यासंदर्भात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुलगी दोन रुपयांची चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेल्यानंतर आरोपीने डावा हात धरून थांबून घेतले आणि पैसे देऊ लागले. दुसऱ्याने तुला काय पैसे लागतील. ते मी देत जाईन. फक्त तू मंदिराकडे येत जा,असे म्हणत पाचशे रुपये दिले. तसेच गळ्यातील मण्यांची माळ धरून कुणालाही याबाबतचे सांगू नकोस म्हणून पीडितेस सांगितले.

तुला काहीही कमी पडू देणार नाही, आयुष्यभर तुझा सांभाळ करतो. यापुढेही सुट्टी असली तर तू दुकानात येत जा, असे म्हणत आरोपींनी पीडितेसोबत लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Kofta Recipe: घरीच बनवा कुरकुरीत पालक कोफ्ते; चव चाखून विसराल हॉटेलची डिश

Maharashtra Live News Update : अंबादास दानवे यांनी घेतली संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेट

Putin india tour : पुतिन यांच्या भारत दौऱ्याने काय मिळणार? या क्षेत्रात होणार फायदा, ८ महत्वाचे करार गेमचेंजर ठरणार?

मार्केट होणार जॅम! Maruti Suzuki e-Vitara लॉन्च; ५०० किमीची रेन्ज अन् ५ हायटेक फीचर्स

नागपूर हादरलं! मुलीच्या डोक्याला दुखापत, मुलाच्या छातीवर शस्त्रानं वार; नंदनवन कॉलनीतील 'त्या' खोलीत जोडप्यासोबत काय घडलं?

SCROLL FOR NEXT