Solapur Natepute canal accident car falls details 
महाराष्ट्र

पहाटे काळाने घाला घातला! त्याची कार थेट कालव्यात गेली, पत्नी अन् सासू-सासऱ्याचा डोळ्यासमोर मृत्यू

Mumbai family accident near Pandharpur canal tragedy : सोलापूरजवळील नातेपुते येथे भीषण अपघातात कार कालव्यात कोसळून पत्नी आणि सासू-सासऱ्यांचा मृत्यू झाला. चालक थोडक्यात बचावला. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर आढावा वाचा.

Namdeo Kumbhar

Solapur Natepute canal accident car falls details : मुंबईहून तो पत्नी आणि सासू-सासऱ्यासोबत घराकडे निघाला होता. रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास मुंबईहून हे कुटुंब आपल्या महागड्या कारने फोंडशिरसकडे निघाले होते. पहाटेच्या वेळी सोलापूरमधील नातेपुतेजवळ आल्यावर काळाने (Solapur accident today) घाला घातला. कार अचानक कालव्याच्या पुलावरून खाली पडली. या दुर्दैवी घटनेत ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. पण चालक थोडक्यात बचावला. त्याच्या डोळ्यासमोरच बायको आणि सासू-सासऱ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पंढरपूरच्या नातेपुतेजवळ निरा उजवा कालव्याच्या पुलावरून ही ईरटीका गाडी कालव्यात पडली. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईवरून फोंडशिरसकडे जात असताना दुर्दैवी घटना घडली. तीन जण गाडीत अडकले होते, त्यांचा मृत्यू झाला. या घटेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि पाटबंधारे खात्याचे शाखा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ मदतकार्य सुरू केले, पम ३ जणांना वाचवू शकले नाहीत. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघातग्रस्त गाडीतील प्रवाशी मूळचे सातारा जिल्ह्यातील दुधबावी येथील आहेत. ते मुंबई येथे नोकरी निमित्त स्थायिक झाले आहेत. फोंडशिरस येथे येत असताना आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्यांच्या गाडीचा अपघात झाला. गाडी चालक सुनील टिळेकर हा बचावला. या गाडीत त्याची पत्नी व सासू, सासरे मयत झाले आहेत. पोलिसांकडून या घटनेची नोंद केली असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांकडून या दुर्घटनेचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावच्या ST बसचा सूरतमध्ये अपघात, ८ जणांचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोघे विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू

हेड कोच मैदानात उतरवून आखणार प्लॅन; ICC कडून क्रिकेटच्या ५ नियमात मोठे बदल

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

SCROLL FOR NEXT