Baban Shinde joins BJP Solapur news : ३ दशकांपासून सोलापूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी उभं आयुष्य घालवले, पण आता माढ्यात प्रस्थापित असणारे शिंदे कुटुंब भाजपच्या वाटेवर आहे. होय.. बबन शिंदे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शिंदेंनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा त्यांना फटका बसला. मुलाची राजकीय कारकीर्द सुरळीत करण्यासाठी त्यांनी पुन्हा शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतला खरा.. पण शरद पवारांनी त्यांना तिकिट देण्यास नकार दिला. आता मुलाचं राजकीय बस्तान बसवण्यासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जातेय. बबनदादा शिंदे यांनी नुकतीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. यामध्ये शिंदे पिता-पुत्राच्या भाजप पक्ष प्रवेशाची चर्चा झाली.
सोलापूरमध्ये मोहिते पाटलांना टक्कर देण्याची ताकद शिंदेंमध्ये असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्याशिवाय माढा, करमाळा, माळशिरस अन् पंढरपूर या तालुक्यात शिंदेंचं चांगलं वजन आहे. पुढील काही दिवसात राज्यात निवडणुका होणर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी बबन शिंदे आणि त्यांच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. बबन शिंदे यांनी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केलेय. त्यामुळे मुलासाठी ते फक्त राजकीय मैदानात प्रचारात उतरू शकतात. याचाच फायदा भाजपला सोलापूरमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी होऊ शकतो.
बबन शिंदे यांच्याकडे तगडा राजकीय अनुभव आहे. १९९५ पासून शिंदेंची माढ्यातून राजकीय कारकीर्द सुरू झाली. मागील ३० वर्षांपासून माढ्याच्या राजकारणात त्यांचे वजन राहिलेय. २०१४ च्या निवडणुकीवेळी शिंदे अन् मोहिते पाटील यांच्यातील वाद सर्वांसमोर आला होता. आता मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी भाजप शिंदेंचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. बबन शिंदे १९९५ ते २०१९ पर्यंत असे सहा टर्मला आमदार राहिलेत. सरपंच ते आमदार-मंत्री असा त्यांचा प्रवास राहिलाय. माढा अन् आजूबाजूच्या परिसरात त्यांचा दबदबा आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागात वजन वाढवण्यासाठी भाजप शिंदेंना आपल्या ताफ्यात घेऊ शकते. पुढील काही दिवसात हा प्रवेश होण्याची शक्यता आहे.
बबन शिंदे यांनी २१ व्या वर्षी राजकीय कारकीर्द सुरूवात केली. २१ व्या वर्षी ते सरपंच झाले होते. १९७२ ते १९८५ या काळात ते निमगाव (टे) ग्राम पंचायतचे सरपंच होते. १९७९ मध्ये ते विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ, चेअरमन होते. पंचायत समिती सदस्य, सभापती, सोलापूर जिल्हा बँकेचे बँकेचे संचालक, जिल्हा दुध संघाचे चेअरमन, आमदार अन् मंत्री असा प्रवास राहिलाय. ९२ ते ९५ या काळात ते काँग्रेसमध्ये होते. १९९५ मध्ये ते अपक्ष आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते आमदार म्हणून निवडून आले. २०१९ पर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहिलेत. २०२४ च्या निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यांच्या मुलाने आमदारकीला नशीब अजमावले, पण त्यांना अपयश आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.