Success Story Saam Tv
महाराष्ट्र

Success Story: स्वप्नपूर्ती! अवघ्या २१ व्या वर्षी मिळवली अमेरिकेत २६ लाख पॅकेजची नोकरी; शेतकऱ्याच्या लेकाचा प्रवास वाचून डोळे पाणावतील

Solapur Madha Boy Get Job in America At age of 21: माढ्यातील तरुणाने अमेरिकेत नोकरी मिळवली आहे. शेतकऱ्याच्या मुलाला परदेशात लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे. त्याच्या या यशामुळे कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे.

Siddhi Hande

माढ्याच्या लेकाने मिळावली अमेरिकेत नोकरी

कमलेश शहाजी कदम याला २६ लाखांच्या पॅकेजची नोकरी

गरिबीवर मात करत शेतकऱ्याच्या लेकाने मिळवलं यश

गरिबी, अडचणी, संघर्ष… ही शब्दं बहुतेक वेळा पराभव दर्शवतात. पण त्याच संघर्षातून स्वतःचा मार्ग घडवत २१ वर्षांचा कमलेश शहाजी कदम आज लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. माढा तालुक्यातील वडशिंगेच्या शेतकरी कुटुंबातील कमलेशने अडचणींवर मात करत थेट अमेरिकेतील D.E. Shaw & Co. या जागतिक दर्जाच्या कंपनीत २६ लाख ८० हजार रुपये वार्षिक पॅकेजवर दमदार निवड होऊन आपल्या कर्तृत्वाची दमदार छाप उमटवली आहे.

बिकट परिस्थितीतून मुलांना शिकवलं

कमलेशच्या घरची परिस्थिती बिकट पण वडील शहाजी कदम यांनी कधीही हार मानली नाही. शेती, मजुरी, टेलरिंग, ड्रायव्हिंग… जे काम मिळेल ते करत त्यांनी दोन्ही मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून, दिवस-रात्र झटत राहिले. करमाळा व कुर्डुवाडी येथे नोकरी करत भाड्याच्या घरात आयुष्य घालवले, पण मुलांच्या शिक्षणाचा ध्यास मात्र कायम ठेवला. कमलेश आणि ऋषिकेश या दोन्ही मुलांसाठी रात्रीचा दिवस कष्ट करत त्यांना शिक्षण दिले.

वडिलांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करतानाच्या अडचणी मुलांनी जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे “कष्टाने माणूस लहान होत नाही” हा वडिलांचा मंत्र मुलांवर खोलवर बिंबला. त्यासाठी शिक्षणातून आपले आयुष्य बदलायच हा ध्यास मनात बाळगून मुलांनी त्या प्रतिकूल परिस्थिती शिक्षण घेतले.

कमलेश लहानपणापासूनच हुशार

लहानपणापासून अभ्यासू आणि मितभाषी असलेला कमलेश सहावीत असताना नवोदय विद्यालय, पोखरापूर येथे निवडला गेला आणि तिथेच त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली. दहावीला ९२.४० टक्के आणि बारावीला ८८ टक्के गुण मिळवून त्याने शैक्षणिक क्षेत्रातील कौशल्य दाखवून दिले. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्याची निवड VIT वेल्लोर येथे BCA कोर्ससाठी निवड झाली. त्याच्या अभ्यासातील एकाग्रता, चिकाटी आणि शिस्तीचा परिणाम अंतिम वर्षात दिसून आला. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये बाजी मारत केवळ २१ व्या वर्षीच अमेरिकेतील D.E. Shaw & Co. मध्ये उच्च पगाराच्या पॅकेजवर नोकरी मिळवण्याचा अपूर्व यशाचा मान त्याने पटकावला.

असंख्य अडचणीसमोर वडिलांनी कधीही हार न मानलेल्या संघर्षाला मुलाने यशाचा मुकुट चढवला आहे. घरातील अडचणी, आर्थिक संकटावर मात करत. ध्येयवेड्या कमलेशने अंतिम वर्षात कॅम्पस प्लेसमेंटमध्ये पहिल्याच प्रयत्नात जगविख्यात कंपनी गाठत स्वप्न पूर्ण केले आहे. त्याची कामगिरी ग्रामीण भागातील तरुणांसाठी आशेचा दीप ठरणार असून, मोठे पगार, मोठी पदे, मोठ्या संधी या फक्त शहरातील मुलांची मक्तेदारी नसून जिद्द आणि परिश्रम असेल तर गावातूनही जग जिंकता येते, हे या यशातून स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Family Man 3: 'द फॅमिली मॅन सीझन ३'साठी मनोज वाजपेयीसह बाकी कलाकारांना किती मिळालं मानधन?

Switch Board Cleaning Tips: घरातला स्विच बोर्ड काळकुट्ट झालाय? असा करा घरच्याघरी साफ, दिसेल पांढराशुभ्र

धनंजय मुंडे काय स्टारपणा दाखवेल? आमच्याकडे त्यांना 'नो एंट्री', राष्ट्रवादीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर|VIDEO

Maharashtra Live News Update : बुटीबोरी नगरपरिषदेत भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले

मोठी बातमी! बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

SCROLL FOR NEXT