Lok Sabha Election 2024 Saam TV
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : 'उमेदवार इथला असो की बाहेरचा...' प्रणिती शिंदेंच्या राम सातपुतेंना पत्रातून हटके शुभेच्छा

Praniti Shinde Letter to Ram Satpute : सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते, असं ट्वीट प्रणिती शिंदेंनी केलं आहे.

Ruchika Jadhav

Solapur Lok Sabha Constituency :

भाजपने पाचव्या यादीत राज्यातील तीन उमेदवारींची घोषणा केली. यामध्ये सोलापूरमधून राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्वीट करून आमदार राम सातपुते यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राम सातपुते यांचं सोलापूर लोकसभेसाठी भाजप उमेदवार म्हणून नाव घोषित झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. "राम सातपुते जी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणुक रिंगणात स्वागत आहे! सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते, असं ट्वीट प्रणिती शिंदेंनी केलं आहे.

"तसंच या उमेद्वारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळालीये त्या बद्दल शुभेच्छा देते. लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे", असं प्रणिती शिंदेंनी आपल्या पत्रात पुढे म्हटलं आहे.

पुढील ४० दिवस याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते. सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापूरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते, अशा शुभेच्छा प्रणिती शिंदेंनी दिल्या आहेत.

प्रणिती शिंदे यांनी दिलेल्या शुभेच्छांचा आमदार राम सातपुते कशा पद्धतीने स्वीकार करतात, हे पाहणं महत्वाचं आहे. सोलापुरात दोन्ही प्रमुख पक्षांकडून युवा उमेदवार दिल्याने निवडणुकीत रंगत येणार असल्याचं स्पष्ट होतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

Ajit Pawar Distributes Kunbi Certificates: मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू, भुजबळांचा सवाल – दाखले आधीच शोधून ठेवले होते का?

SCROLL FOR NEXT