solapur, Solapur LCB, Youth saam tv
महाराष्ट्र

एलसीबीचा नवीन बारवर छापा; सहा महिला, चार बाऊन्सरसह २८ जणांवर गुन्हा दाखल

या छाप्यात एकूण १४ लाख ४६ हजार ७२५ किमतीचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापुरातील (solapur) तुळजापूर (tuljapur) रोडवरील हगलूरमध्ये तीन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या एका रेस्टॉरंट अँड बारवर पोलिसांनी (police) छापा टाकला. त्यानंतर पाेलिसांनी एकूण 28 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील काहींना अटक करण्यात आली आहे. (Solapur Crime News)

सोलापुरातील तुळजापूर रोडवरील हगलूरमध्ये तीन दिवसांपूर्वी संबंधित बार मालकाचा वाढदिवसाचा केक कापून या ठिकाणी ऑर्केस्ट्रा बार सुरू करण्यात आला होता. त्यांचा हा आनंद अद्याप ओसरला नसताना तिसऱ्या दिवशीच सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बारवर छापा टाकला.

या बारमध्ये अश्लिल नृत्य करणाऱ्या सहा महिला,चार बाऊन्सरसह २८ जणांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी डीजे म्युझिकल साउंड सिस्टम, लॅपटॉप, लाईट सिस्टीम, विदेशी दारूचे क्वार्टर आणि बिअरचा साठा, तसेच १५ दुचाकी जप्त केल्या आहेत. या सर्वांची किंमत सुमारे १४ लाख ४६ हजार ७२५ इतकी असल्याचे पाेलिसांनी सांगितलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: पुण्यातील फेमस रीलस्टारला अटक; ५ हजारांहून अधिक बँक खात्यांतून १० कोटींचं मनी ट्रेल, हाँगकाँग कनेक्शन उघड

बीड पुन्हा हादरलं! पेट्रोलपंपाजवळ गोळीबाराचा थरार; वाल्मीक कराड कनेक्शन आलं समोर

Mumbai : पाणी टंचाईची कटकट संपली! मुंबईच्या तलावांमध्ये ८९.४९ टक्के पाणीसाठा, कोणते तलाव किती भरले? जाणून घ्या

पैसे अपूर्ण मिळाले म्हणून 'खरेदीखत' अवैध ठरत का? मालकी हक्क कोणाचा असतो, सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निर्णय काय?

Kidney Health Tips : जीमनंतर प्रोटीन पावडर खाल्ल्याने किडनीवर होऊ शकतो परिणाम, वेळेआधीच जाणून घ्या 'या' ६ गोष्टी नाहीतर....

SCROLL FOR NEXT