School Saam Tv
महाराष्ट्र

शाळेत उशिरा येणाऱ्या शिक्षकांवर हाेणार कठाेर कारवाई; वाचा शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश

शनिवारी काही शाळेत 16 शिक्षक उशिरा आल्याने शिक्षणाधिकारी लाेहार यांनी काढला आदेश.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : शाळेची (school) वेळ सकाळी १० ते सायंकाळी साडे पाचपर्यंत असते, शनिवारी सकाळी आठ वाजता शाळा भरते. मात्र, शिक्षक (teachers) वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची (student) पंचाईत होते. या पार्श्वभूमीवर आता सर्व शिक्षकांनी शाळा भरण्यापूर्वी अर्धा तास अगोदर शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी काढला आहे. (solapur latest marathi news)

सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार (kiran lohar) यांनी काढलेल्या आदेशात जे शिक्षक वेळेवर येणार नाहीत, त्यांना त्या दिवशीचा पगार मिळणार नाही अशी स्वरुपाची कठाेर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.

शाळेच्या वेळेत दुरून येणाऱ्या शिक्षकांना पोचता येत नसल्यास २४ जून २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे त्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहावे असा नियम असल्याचे लाेहार यांनी स्पष्ट केले. मात्र परगावाहून येणारे बहुतेक शिक्षक गावात (village) राहातच नाहीत. गेल्या वेळेस अनेक शिक्षकांनी मुख्यालयात राहात असल्याचे प्रमाणपत्र दिले पण प्रत्यक्षातील वस्तुस्थिती वेगळीच होती. आता मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याची सक्ती केली जाणार नाही, पण वेळेत शाळेत न येणाऱ्या शिक्षकांना त्या दिवसाचा पगार मिळणार नाही. मोहोळ तालुक्यातील पेनूर (penur) येथे जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमध्ये शनिवारी १६ शिक्षक शाळा भरल्यानंतर आले हाेते. याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी लाेहार यांच्यापर्यंत पाेहचली. त्यानंतर शिक्षणाधिकारी लाेहार यांनी नवा आदेश काढला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात होणार बंडखोर खासदारांचा फैसला; २०खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT