Solapur Dr Shirish Valsangkar death case Manisha Mahesh Musale Saam Tv News
महाराष्ट्र

Dr. Valsangkar: डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरण; शेवटच्या चिठ्ठीत उल्लेख केलेल्या 'त्या' महिलेला कोर्टाचा दणका

Accused Manisha Manes 3-Day Police Custody Approved by Solapur Court: सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी मनिषा माने हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी मनिषा माने हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायालयाचे न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी ही पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली मनीषा मानेच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता आरोपी महिलेची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा माने हिला कामावरून काढण्यात आले होते. त्यानंतर या महिलेने डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सुसाईड नोटमध्ये देखील त्या महिलेचा उल्लेख आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली.

सदर बझारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने ही कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपी मनिषा माने हिच्यासोबत आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

आरोपी मनीषा मुसळे माने नक्की आहे तरी कोण?

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मनीषा मुसळे माने या महिलेचं नाव पुढे आलं होतं. आत्महत्या करण्यापूर्वी वळसंगकर यांनी चिठ्ठी लिहीली होती. त्या सुसाईड नोटमध्ये मनीषा माने या महिलेच्या नावाचा उल्लेख होता. पोलिसांना ही सुसाईड नोट सापडताच त्यांनी कारवाई करत आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे. आरोपी मनीषा माने रूग्णालयातच प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT